शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

दहा जिल्ह्यांत ८.५ लाख हेक्टरवरील पिके गेली वाहून; शेतकरी रडकुंडीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 11:22 IST

Damage to crops due to heavy rainfall : राज्यात सप्टेंबरच्या पहिल्या चार दिवसांतच झालेल्या अतिवृष्टीमुळे १० जिल्ह्यांतील तब्बल साडेआठ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर, ६०० हेक्टर जमीन खरवडून गेली आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये मुख्यत्वे कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी, मूग, उडीद, मका, कांदा, डाळिंब, पेरू, पपई, भाजीपाला या पिकांचा समावेश आहे.

 पुणे -  राज्यात सप्टेंबरच्या पहिल्या चार दिवसांतच झालेल्या अतिवृष्टीमुळे १० जिल्ह्यांतील तब्बल साडेआठ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर, ६०० हेक्टर जमीन खरवडून गेली आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये मुख्यत्वे कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी, मूग, उडीद, मका, कांदा, डाळिंब, पेरू, पपई, भाजीपाला या पिकांचा समावेश आहे. सर्वाधिक ३ लाख ३९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान नांदेड जिल्ह्यात झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी लातूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पिकांचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्यात गेल्या चार दिवसांपासून मराठवाड्यासह विदर्भात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. यात १० जिल्ह्यांमध्ये ८ लाख ४८ हजार ९८५ हेक्टरवरील नुकसान झाले आहे. त्यात कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी, मूग, उडीद, मका, कांदा, डाळिंब, पेरू, पपई, मोसंबी तसेच भाजीपाला पिकांचाही समावेश आहे. सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात ३ लाख ३९ हजार १४७ हेक्टरवरील पिकांचे झाले असून, त्या खालोखाल जालना जिल्ह्यातील २ लाख ११ हजार ७३१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात १ लाख ७१ हजार २९९ हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली आहेत. 

अतिवृष्टीमुळे ४ जिल्ह्यांमध्ये ५९९ हेक्टर जमीन खरवडून निघाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. सर्वाधिक ३०७ हेक्टरवरील जमीन यवतमाळ जिल्ह्यात खरवडून निघाली, नांदेडमध्ये १९२, वाशिम ५२,  बुलढाणा ४८ हेक्टर जमीन खरवडून निघाली आहे. आणखी दोन जिल्ह्यांमधील नुकसानीची आकडेवारी गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

नुकसानीचे पंचनामे ताबडतोब करा : मुख्यमंत्रीमुंबई : मागील दोन दिवस मुसळधार पावसामुळे राज्यात विशेषतः विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. यासह इतर जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिल्या.पिकांचे झालेले नुकसान, घरांची पडझड, पशुधनाची हानी अशा सर्व बाबींची माहिती घेण्यात यावी, यासंदर्भात त्वरित पंचनामे करावेत. अतिवृष्टीमुळे तात्पुरते स्थलांतर केलेल्या लोकांना आवश्यक सर्व सुविधा द्याव्यात. विभागीय आयुक्त, जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, स्थानिक नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायती, पोलिस प्रशासन आदी सर्वांनी समन्वयाने यासाठी काम करावे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास खुला ठेवावा, याद्वारे मदत आणि पुनर्वसनाचे सनियंत्रण करावे, स्थलांतर केलेल्या लोकांसाठी चांगल्या दर्जाचे तात्पुरते निवारे उभे करावेत, त्यांना कपडे, अन्न, शुद्ध पाणी, औषधे इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा ताबडतोब पुरवठा करावा, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. 

नुकसानीच्या पाहणीसाठी ड्रोन वापरा परभणी - विद्यापीठाने विकसित प्रक्षेत्रावर पूर्णतः संगणकीकरण तसेच यांत्रिकीकरण करून स्वयंचलित शेती विकसित करावी. ड्रोनचा वापर नुकसान झालेल्या पिकांच्या पाहणीसाठी करावा, पीक नुकसानीचा अंदाज द्यावा, असे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंढे यांनी आढावा बैठकीत दिले. 

सरकाने दगाफटका करू नये : जरांगे वडीगोद्री (जि. जालना) : सरकारने तातडीने शेतकऱ्याला वाचवावे. शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत सरकारने पाहू नये, मी नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांना कळवणार आहे, असे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते  मनोज जरांगे-पाटील बुधवारी म्हणाले. 

आदित्य ठाकरे यांनी केली पाहणीबदनापूर (जि. जालना) : युवासेना प्रमुख उद्धवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बुधवारी सकाळी बदनापूर तालुक्यातील अंबडगाव येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, पक्ष तुमच्या पाठीशी असल्याचे आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना सांगितले. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर व्यथा मांडल्या.

जिल्हा    नुकसान (हेक्टरमध्ये)नगर    १५,६८४जालना    २,११,७३१धाराशिव    ६,०६७नांदेड    ३,३९,१४७लातूर    ५,७६८बुलढाणा    ११,५६१अकोला    ८६,८१५वाशिम    ३५५अमरावती    ५५७यवतमाळ    १,७१,२९९एकूण    ८,४८,९८५

 

टॅग्स :RainपाऊसfloodपूरCropपीकMaharashtraमहाराष्ट्र