शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख हेक्टरवरील पिकांची माती, सर्वाधिक नुकसान नाशिक, बुलढाण्यात; ६ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 07:27 IST

Unseasonal rain in Maharashtra: राज्यात मागील दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे १६ जिल्ह्यांतील अंदाजे १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

मुंबई : राज्यात मागील दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे १६ जिल्ह्यांतील अंदाजे १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. बुलढाणा आणि नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. हा आकडा आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. या नैसर्गिक आपत्तीत सहाजणांनी आपला जीव गमावला असून, १६१ जनावरे दगावली आहेत. 

कापूस, कांदा, द्राक्ष, केळी, मोसंबी, डाळिंब, काढणीस आलेला भात, ज्वारी, गहू, हरभरा यांसह भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी, मदत व पुनर्वसन आणि महसूल विभागाच्या वतीने झालेल्या नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. जिथे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल तिथे मदत करण्यासाठी शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहण्याची शासनाची भूमिका असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक : सरकार काय देणार?राज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी होत असून तीत अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची चर्चा होणार आहे. शेतकऱ्यांना मदत जाहीर करणार का, या बाबत उत्सुकता आहे. नेमके किती नुकसान झाले याची माहिती प्रशासनाकडून मंत्रिमंडळ बैठकीत दिली जाणार आहे. शेतकऱ्यांची आजची स्थिती पाहता नियम, अटी, पंचनामे या कामात वेळ न घालवता तातडीने मदत देण्याची गरज आहे. कोरडवाहू शेतीसाठी एकरी २५ हजार रुपये व बागायती शेतीच्या नुकसानीपोटी एकरी ५० हजार रुपयांची मदत तत्काळ द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली.

 

टॅग्स :CropपीकRainपाऊसFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र