गृहराज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात गुन्हेगारीत वाढ- नितेश राणे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2018 04:47 PM2018-02-25T16:47:21+5:302018-02-25T16:47:21+5:30

आपण पर्यटन जिल्ह्याकडे वाटचाल करीत असताना सिंधुदुर्गमध्ये घडणारे वाढते गुन्हे यामुळे येथील पर्यटन धोक्यात येत आहे. गृहराज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात तर गेल्या काही वर्षांत गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे.

Criminal increase in GHRM seats - Nitesh Rane | गृहराज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात गुन्हेगारीत वाढ- नितेश राणे

गृहराज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात गुन्हेगारीत वाढ- नितेश राणे

Next

सिंधुदुर्ग : आपण पर्यटन जिल्ह्याकडे वाटचाल करीत असताना सिंधुदुर्गमध्ये घडणारे वाढते गुन्हे यामुळे येथील पर्यटन धोक्यात येत आहे. गृहराज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात तर गेल्या काही वर्षांत गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्राच्या क्राईम अहवालानुसार सिंधुदुर्गमध्ये २०१४च्या तुलनेत २०१७मध्ये साडेतीन टक्क्यांनी गुन्हेगारी वाढली आहे, अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली. ते महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष सावंतवाडी आयोजित माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या सुंदरवाडी महोत्सवाच्या तिस-या पर्वाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, संदीप कुडतरकर, तालुकाध्यक्ष संजू परब, सभापती रवींद्र मडगावकर, शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, नगरसेवक राजू बेग, उदय नाईक, गुरू पेडणेकर, उपसभापती निकिता सावंत, महिला तालुकाध्यक्ष गीता परब, जिल्हा परिषद सदस्या शर्वाणी गावकर, पल्लवी राऊळ, उन्नती धुरी, नगरसेवक अ‍ॅड. परिमल नाईक, उदय नाईक, दीपाली भालेकर, उत्कर्षा सासोलकर, समृद्धी विरनोडकर, आनंद शिरवलकर, केतन आजगावकर, किरण सावंत, गुरू मठकर, दिलीप भालेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर केला.
सावंतवाडीला एका सांस्कृतिक चळवळीचा वारसा आहे. हीच सांस्कृतिक चळवळ पुढे नेण्याचे काम माजी खासदार निलेश राणे, संजू परब व त्यांचे सहकारी करीत आहेत. एवढा मोठा महोत्सव सलग तीन वर्षे आयोजित करणे हे सोपे काम नाही. त्यासाठी कार्यकर्त्यांची मेहनत निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. सावंतवाडीची प्रतिमाच या महोत्सवाच्या माध्यमातून उंचावण्याचे काम त्यांनी केले आहे, असे गौरवोद्गार आमदार नितेश राणे यांनी काढले. सावंतवाडीचा विकास झाला पाहिजे, पण तसे होताना दिसत नाही. कणकवली येथे अद्ययावत चित्रपटगृह आहे. पण सावंतवाडीत नाही. येथील कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. एखादी व्यक्ती जर चित्रपट पाहण्यासाठी गेला तर त्याला आपण सुरक्षित घरी जाऊ का याची चिंता वाटते.

सावंतवाडीमध्ये पर्यटन वाढावे असे वाटत असेल, तर गुन्हेगारी थांबली पाहिजे आणि आम्हीही टीका विरोधक म्हणून करीत नाही, राज्याचा एक क्राईम अहवाल निघतो, त्यात सर्व साधारणपणे आकडेवारी दिली आहे. या आकडेवारीत जिल्ह्यात तीन वर्षांपूर्वीचे गुन्हे आणि आता वाढ झालेले गुन्हे यांचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे गृहराज्यमंत्र्यांनी याचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही यावेळी आमदार राणे यांनी दिला आहे. मी येत्या अधिवेशनात शांत बसणार नाही. सावंतवाडीत घडणारे सर्व प्रकार विधानसभेत मांडणार असून, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही करणार आहे. पर्यटन जिल्हा करीत असताना हे चालले ते योग्य नाही. गोवा पर्यटनावर चालतो, पण तेथे अशी गुन्हेगारी नाही याचाही विचार झाला पाहिजे, असेही आमदार राणे म्हणाले.

महोत्सवाच्या निमित्ताने डॉ. राजेश नवांगुळ, प्रदीप सावंत, स्नेहा टिळवे, उद्योजक राजन आंगणे, डॉ. विष्णू नाईक आदींचा सत्कार करण्यात आला. तर स्वाभिमानचे नेते संदीप कुडतरकर यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर सडकून टीका केली.
तसेच कणकवली येथे नाट्यगृह होऊ शकते, मग सावंतवाडीमध्ये का होत नाही, असा सवाल उपस्थित केला. तर किरण सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा करण्यात नारायण राणे यांचा मोठा वाटा आहे. त्यानंतर अनेक तालुक्यात महोत्सव झाले, असे सांगितले.

बाबा माका संकासूर बघूचो हा! संवादाला रसिकांची दाद
कलाकार सार्थक वाटवे यांचा आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सार्थक याने दोन विनोदही यावेळी रसिकांसमोर सादर केले. यात बाबा माका संकासूर बघूचो हा असे म्हणताच उपस्थितांनी त्याला चांगलीच दाद दिली. यावेळी भार्गवी चिरमुले, केतकी पालव, प्रांजल पालकर व संदीप गायकवाड, प्रसाद खांडेकर यांच्यासह लावणी सम्राज्ञी प्रियांका जाधव व निशा बारोत यांचा नृत्याविष्कार व कार्यक्रमांनी पहिल्या दिवसाचा कार्यक्रम यादगार ठरला.

Web Title: Criminal increase in GHRM seats - Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.