मोलकरणीला मारहाण केल्याप्रकरणी विनोद कांबळीविरोधात गुन्हा

By Admin | Updated: August 30, 2015 09:26 IST2015-08-30T09:21:35+5:302015-08-30T09:26:49+5:30

पगार मागितला म्हणून विनोद कांबळी व त्याची पत्नी अँड्रिया या दोघांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप विनोद कांबळीच्या मोलकरणीने केला आहे.

Criminal case against Vinod Kambli for assault on Manikarni | मोलकरणीला मारहाण केल्याप्रकरणी विनोद कांबळीविरोधात गुन्हा

मोलकरणीला मारहाण केल्याप्रकरणी विनोद कांबळीविरोधात गुन्हा

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ३० - पगार मागितला म्हणून विनोद कांबळी व त्याची पत्नी अँड्रिया या दोघांनी बेदम मारहाण  केल्याचा आरोप विनोद कांबळीच्या मोलकरणीने केला आहे. याप्रकरणी विनोद कांबळी व त्याच्या पत्नीविरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. 

विनोद कांबळीच्या घरी काम करणा-या मोलकरणीचा व कांबळी दाम्पत्यामध्ये पगारावरुन वाद होता. मोलकरणीने कांबळी दाम्पत्याकडे पगारवाढ मागितली होती. यानंतर कांबळी दाम्पत्याने तीन दिवस एका खोलीत डांबून ठेवले व मारहाण केली असा आरोप त्यांच्या मोलकरणीने केला आहे. तीन दिवसांनी सुटका झाल्यावर मोलकरणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी विनोद कांबळीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

Web Title: Criminal case against Vinod Kambli for assault on Manikarni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.