शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

तीन अहवालांमुळे राज्य बँकेच्या माजी संचालकांवर होणार गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 21:12 IST

उच्च न्यायालयाने संबंधित प्रकरण गुन्हेगारी स्वरुपाचे असल्याचे निरीक्षण नोंदवित पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

पुणे : साखर कारखान्यांना होणारे कर्ज वितरण आणि कारखान्यांची मालमत्ता विक्रीत झालेली अनियमितता सहकार विभागाच्या कलम ८३ नुसारच्या कारवाईत, नॅशनल अ‍ॅग्रीकल्चरल बँक फॉर रुरल डेव्हलपमेंटने (नाबार्ड) केलेली तपासणी आणि बँकेच्या अंतर्गत लेखापरीक्षण अहवालानुसार अधोरेखीत झाली. या अहवाला नुसारच उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या तत्कालिन संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई आर्थिक गुन्हे शाखेला दिले आहेत. पोलिसांना तपासासाठी आवश्यक कागदपत्रे पुरवून देण्याची जबाबदारी बँक प्रशासनाची असल्याची प्रतिक्रिया बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली. राज्य सहकारी बँकेत अडीच हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने संबंधित प्रकरण गुन्हेगारी स्वरुपाचे असल्याचे निरीक्षण नोंदवित पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यात सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश असून, ७६ जणांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. मार्च २०१० रोजी बँकेकडे २१,४२० कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. तर, २०१४ साली प्रशासकांची नेमणूक होईपर्यंत ठेवींचे प्रमाण ११,८०० कोटी रुपयापर्यंत खाली आले होते. सहकार आयुक्तालयाने ८३ नुसार केलेल्या कारवाईचा अहवाल, नाबार्ड बँकेचा त्यावर्षीचा तपासणी अहवाल आणि राज्य सहकारी बँकेने केलेली अंतर्गत तपासणी याच्या आधारेच बँकेने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांच्या तपासासाठी आवश्यक असतील तितकी कागदपत्रे देण्याची जबाबदारी बँक प्रशासनाची असेल. आम्ही पोलिसांच्या तपासाला संपूर्ण सहकार्य करु, असे अनास्कर यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :PuneपुणेbankबँकCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी