शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
3
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
4
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
5
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
9
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
10
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
11
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
12
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
13
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
14
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
15
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
16
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
17
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
18
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
19
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
20
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा

क्राइम ब्रँचची ‘लोणकढी थाप’!

By admin | Updated: August 27, 2015 02:43 IST

सुमारे आठ वर्षांपूर्वी मुंबईत रफी अहमद किडवई मार्गावरील नॅशनल मार्केटमध्ये एकाला अटक करायला गेलेल्या पोलीस पथकावर व्यापारी व इतरांच्या जमावाने हल्ला करून अटक

मुंबई : सुमारे आठ वर्षांपूर्वी मुंबईत रफी अहमद किडवई मार्गावरील नॅशनल मार्केटमध्ये एकाला अटक करायला गेलेल्या पोलीस पथकावर व्यापारी व इतरांच्या जमावाने हल्ला करून अटक केलेल्या आरोपीला त्यांनी सोडवून नेले, ही गुन्हे शाखेने मारलेली ‘लोणकढी थाप’ उच्च न्यायालयाच्याही पचनी पडलेली नाही.२४ आॅक्टोबर २००७ रोजी घडलेल्या या कथित घटनेवरून क्राइम ब्रँचच्या युनिट ४ ने सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद यासीन मोहम्मद इब्राहीम शेख यांच्यासह २२ जणांविरुद्ध बेकायदा जमाव जमविणे, दंगल करणे, पोलिसांच्या कामात व्यत्यय आणणे, दगडफेक करून जखमी करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे यासारख्या आरोपांवरून खटला दाखल केला होता. सत्र न्यायालयाने या सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले होते. त्याविरुद्ध अपिलाची परवानगी मागणारा अर्ज न्या. अभय ठिपसे यांनी फेटाळून लावला. विशेष म्हणजे आरोपींविरुद्ध कोणताही पुरावा नाही. मुळात पोलीस ज्याला अटक करायला म्हणून तेथे गेले होते, त्याच्याविरुद्ध कोणताही गुन्हा नोंदविलेला नव्हता. त्यामुळे पोलिसांनी केलेली कारवाईच पूर्णपणे बेकायदा होती. एवढेच नव्हे तर हा खटला म्हणजे पोलिसांनी स्वत:ची बेकायदा कृती दडपण्यासाठी अरेरावीने रचलेले कुभांड आहे, या सत्र न्यायालयाच्या निष्कर्षांवर न्या. ठिपसे यांनी शतप्रतिशत शिक्कामोर्तब केले. नॅशनल मार्केटमधील भुल्लू या इसमाविरुद्ध किडवई मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीवरून आम्ही तेथे गेलो. भुल्लूला पकडून परतत असताना व्यापारी व इतरांचा दोन-तीन हजारांचा जमाव जमला. जमावाने पोलिसांचा रस्ता अडविला व दगडफेक केली. या दंगलसदृश वातावरणात पकडलेला भुल्लू आमच्या ताब्यातून सुटून पळाला, असे कथानक पोलिसांनी रचले होते. सत्र न्यायालयाच्या पाठोपाठ आता उच्च न्यायालयानेही ते असंभवनीय ठरवून अमान्य केले आहे. (विशेष प्रतिनिधी)न्यायालयाने ओढलेले असूड..भुल्लूविरुद्ध कोणत्याही दखलपात्र गुन्ह्याची नोंद नव्हती. त्यामुळे त्याला धरून आणण्यासाठी पोलिसांनी नॅशनल मार्केटमध्ये जाणेच मुळात बेकायदा होते. जमावाने दगडफेक केली व त्यात पोलीस वाहनांचे नुकसान झाले आणि काही पोलीस जखमी झाले यास कोणताही पुरावा नाही.मोहम्मद इब्राहीम शेख हे त्या भागातील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते आहेत. भुल्लू हा त्यांचा पुतण्या आहे. त्यामुळे पोलिसांनी भुल्लूला पकडल्यावर शेख यांनी मध्ये पडणे स्वाभाविक होते.खरेतर किडवई मार्ग पोलीस ठाण्याचे माजी निरीक्षक विलास जोशी यांचा शेख यांच्यावर डोळा होता. त्यामुळे कदाचित जोशी यांनीच हे पोलीस पथक पाठविले असावे, या समजातून व्यापारी व इतरांनी गर्दी करणे म्हणजे बेकयदा जमाव जमविणे होत नाही. मुळात पोलिसांना बेकायदा कृत्याचा जाब विचारणे हा त्यांच्या कामात व्यत्यय ठरत नाही.