काँगे्रस नगरसेवकाविरुद्ध गुन्हा

By Admin | Updated: May 25, 2014 04:51 IST2014-05-25T04:51:07+5:302014-05-25T04:51:07+5:30

रावेत येथे गोळ्या झाडून हॉटेल व्यवस्थापकाचा खून केल्याच्या आरोपावरून भोसरीतील काँग्रेसचे नगरसेवक जालिंदर शिंदे याच्यासह चौघांविरुद्ध देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Crime against Congress corporator | काँगे्रस नगरसेवकाविरुद्ध गुन्हा

काँगे्रस नगरसेवकाविरुद्ध गुन्हा

किवळे/पिंपरी : रावेत येथे गोळ्या झाडून हॉटेल व्यवस्थापकाचा खून केल्याच्या आरोपावरून भोसरीतील काँग्रेसचे नगरसेवक जालिंदर शिंदे याच्यासह चौघांविरुद्ध देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक दत्तोबा शिंदे (वय ३७, रा. हॉटेल शिवनेरी, रावेत; मूळ गाव वेल्हा) असे खून झालेल्या हॉटेल व्यवस्थापकाचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी भोसरी येथील काँग्रेसचा नगरसेवक जालिंदर शिंदे याच्यासह कुणाल लांडगे, नरेंद्र भोईर आणि विशाल टिंगरे या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणाला अटक झालेली नाही. दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी बंदुकीतून तीन गोळ्या झाडून शिंदे यांचा खून केला. देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर रावेत येथील हॉटेल शिवनेरी येथे शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. चार दिवसांपर्ू्वी हॉटेलमध्ये जेवणाच्या बिलावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. भांडणाच्या सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी जालिंदर शिंदे यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी शनिवारी यांच्याव्यतिरिक्त आणखी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींना पकडण्यासाठी चार पोलीस पथके रवाना झाली आहेत. विनायक शिंदे यांच्यावर गोळीबार करणार्‍या वरील चारही आरोपींना पकडण्यासाठी देहूरोड पोलिसांची चार पथके त्यांच्या मागावर असून संबंधित आरोपींना पकडण्यात पोलिसांना लवकरच यश येईल असा विश्वास पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Crime against Congress corporator