नगरसेवकासह ४० जणांवर गुन्हा

By Admin | Updated: November 17, 2015 01:24 IST2015-11-17T01:24:35+5:302015-11-17T01:24:35+5:30

मुकुंदनगर परिसरात रविवारी झालेल्या गोळीबारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक समद खान याच्यासह तब्बल ४० जणांवर कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Crime against 40 people including corporator | नगरसेवकासह ४० जणांवर गुन्हा

नगरसेवकासह ४० जणांवर गुन्हा

अहमदनगर : मुकुंदनगर परिसरात रविवारी झालेल्या गोळीबारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक समद खान याच्यासह तब्बल ४० जणांवर कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडीत ठोठावण्यात आली आहे.
पूर्ववैमनस्यातून मुकुंदनगरला दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली होती. झटापटीत बंदुकीतून गोळी सुटल्याने एक युवक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये राष्ट्रवादीचा नगरसेवक समद खान याचाही समावेश असून, तो फरार झाला आहे.
मुजीब अजीज खान याच्यावर सादिक पोटली, मज्जू रहीम, दिलावर भैय्या यांनी पिस्तुल, दांडके, काठ्या, तलवारी घेऊन हल्ला केला. कुटुंबीयांचे दागिने बळजबरीने हिसकावून घेतले. दुचाकींची तोडफोड केली. मुजीब अजीज खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कॅम्प पोलिसांनी मारहाण, दरोडा, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी ३० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Crime against 40 people including corporator