शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

मुंबई-गोवा महामार्गावरील काँक्रिटीकरणाला गेले तडे; ठेकेदाराकडून मागविला अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 09:02 IST

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या प्रकरणात लक्ष घातल्याचे दिसत आहे

लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : मुंबई-गोवामहामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम काँक्रिटीकरणाच्या साहाय्याने करण्यात येत आहे. मात्र, काँक्रिटीकरण दर्जेदारपणे करण्यात येत नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते, तसेच वाहनचालकांकडून करण्यात येत आहे, तर निकृष्ट कामामुळे महामार्गाला तडे गेल्याचे निदर्शनास येत असून, याबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कंत्राटदार कंपनीकडून अहवाल मागविला आहे. तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी जरी डिसेंबर २०२३ पर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होणार असल्याचे जाहीर केले असले तरी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणण्यानुसार हे काम मे २०२४ मध्ये पूर्ण होणार आहे, अशी माहिती मिळत आहे.

पळस्पे ते इंदापूरदरम्यान ८४ किलोमीटर लांबीचे मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम २०११ मध्ये सुरू झाले. मात्र, १२ वर्षांचा कालावधी उलटूनही महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. सद्य:स्थितीत महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी छोटे-मोठे खड्डे पडले आहेत. सुरुवातीला पळस्पे ते इंदापूर दरम्यान चौपदरीकरणाचे काम डांबरीकरणाच्या माध्यमातून करण्यात येत होते. मात्र, सध्या चौपदरीकरण काँक्रिटीकरणाच्या साहाय्याने केले जात आहे. या कामाचे पळस्पे ते कासू आणि कासू ते इंदापूर असे दोन भाग केले आहे. त्यानुसार काँक्रिटीकरणाचे काम करताना सुमारे आठ इंच व्हाइट टॉपिंग (अस्तित्वात असलेल्या डांबरी फूटपाथला सिमेंट काँक्रीटच्या थराने झाकून) उंचीचे स्लॅब घातले आहेत.

व्हाइट टॉपिंग कार्यान्वित

 भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पनवेल ते कासू विभाग डिसेंबर २०२३ पर्यंत, तर कासू ते इंदापूर मे २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सध्या पनवेल ते कासू विभागाचा सुमारे १७ कि.मी., तर कासू ते इंदापूर दरम्यान सुमारे १.५५० कि.मी.च्या एका लेनवर व्हाइट टॉपिंग कार्यान्वित करण्यात आली आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे उपमहाव्यवस्थापक वाय. एन. गोतकर यांनी दिली.

टॅग्स :Mumbaiमुंबईgoaगोवाhighwayमहामार्ग