शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
2
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
5
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
6
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
7
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
8
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
9
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
10
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
11
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
12
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
13
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
14
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
15
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
16
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
17
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
18
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
19
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना

गोसंरक्षण करणारी व्यवस्था निर्माण होणे गरजेचे : मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 22:08 IST

उपयोगी पडणाऱ्या सर्व प्राणीमात्रांना मातृत्व देणे ही भारताची हजारो वर्षांची परंपरा..

ठळक मुद्देगायीचे महत्व विज्ञानावर सिद्ध झाल्याचा दावा

पुणे : देशी गायींचे महत्व आता विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध झाले आहे. मानवी जीवन तसेच शेतीसाठीही देशी गाय महत्वाची आहे. उपयोगी पडणाऱ्या सर्व प्राणीमात्रांना मातृत्व देणे ही भारताची हजारो वर्षांची परंपरा आहे, म्हणूनच गोमातेला वाचवणारी एक सक्षम यंत्रणा निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.गो विज्ञान संशोधन संस्था व दादरा नगर हवेली मुक्ती संग्राम समिती यांच्या वतीने डीपी रस्त्यावरील शुभारंभ लॉन्स येथे भागवत यांच्या हस्ते मोरोपंत पिंगळे गोसेवा पुरस्कार देण्यात आले. समितीचे अध्यक्ष शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, संशोधन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र लुंकड, बापू कुलकर्णी, पुणे महानगर संघचालक रविंद्र वंजारवाडकर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. पिंगळे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे.भागवत म्हणाले, गायीचे महत्व आता विज्ञानाने सिद्ध केले आहे. देशी गायींवर आधारीत शेतीतून पिकणारे धान्य विषमुक्त होते, आता खतांमधून तयार होणारे धान्य विषयुक्त आहे. कत्तलखान्यात जाणाºया गायी वाचवल्या तर त्या पाळण्यासाठी कोणी तयार होत नाही. कत्तलखान्यात गायी नेणारेही हिंदू ठेकेदारच असतात. म्हणूनच  गो संरक्षण करणारी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे व ते शक्य आहे.मोरोपंत पिंगळे हे अशक्य कामे करणारे व्यक्तीमत्व होते. सरस्वती नदीचा त्यांनी शोध लावला. १५ व्या शतकापासून राम मंदिर बांधण्याचा प्रयत्न होत होता, पिंगळे यांनी ते काम हाती घेतले व आता मंदिर बांधले जाणार आहे. गो संरक्षण हाही त्यांचाच ध्यास होता व तो आता प्रत्यक्षात येणार आहे असे भागवत म्हणाले. त्यांनी स्थापन केलेल्या संस्थांचा अल्पावधीतच देशभर विस्तार झाला, गो सेवा संस्था हाही त्याचाच एक भाग असून आता तर वैज्ञानिक प्रयोगांमधूनही गोमूत्र, शेण, यांचे शास्त्रीय महत्व सिद्ध झाले आहे असे त्यांनी सांगितले. कलकत्ता येथील गो सेवा संस्था, तळेगाव दाभाडे येथील ज्योती मुदरंगी,  भोसरी येथील अजित उदावंत, पुनम राऊत, शाम अगरवाल यांना गो सेवा पुरस्कार देण्यात आले. लुंकड यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. पुनम राऊत व मुदरंगी यांनी मनोगत व्यक्त केले. गो पूजन व रामदास सोंगटे यांनी म्हटलेले गो माता गौरव श्लोकाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. सुप्रिया अत्रे यांनी सुत्रसंचालन केले.  

टॅग्स :PuneपुणेcowगायMohan Bhagwatमोहन भागवतGovernmentसरकार