शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

गाई-म्हशीचे दूध दोन रुपयांनी महागले, उद्यापासून अंमलबजावणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 09:05 IST

दूध कल्याणकारी संघाच्या पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यत आला

पुणे - सर्वसामान्यांना दूध खरेदी करण्यासाठी रविवारपासून प्रतिलीटर दोन रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. कल्याणकारी दूध संघाने गाईच्या आणि म्हशीच्या दुधात प्रत्येकी दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या दरांनुसार आता गाईचे दूध 48 रुपये तर म्हशीचे दूध 58 रुपये झाले आहे.  राज्यातील दूध कल्याणकारी संघाच्या पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यत आला असून, त्याची अंमलबजावणी रविवारपासून होणार आहे. कल्याणकारी दूध संघाच्या पुण्यात झालेल्या बैठकीला राज्य कल्याणकारी दूध संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के सचिव प्रकाश कुतवळ, खजिनदार डॉ. विवेक क्षीरसागर यांच्यासह अन्य सदस्य आणि प्रतिनिधी उपस्थित होते. दरवर्षी हिवाळ्यात दूध उत्पादन वाढते. मात्र यावर्षी उशिरापर्यंत पडलेल्या पावसामुळे दुधाच्या उत्पादनात 10 टक्क्यांनी घट झाली आहेत. त्यामुळे अपरिहार्यपणे दुधाच्या दरात वाढ करावी लागल्याचे कल्याणकारी दूध संघाकडून सांगण्यात आले.  नव्या दरांनुसार दुधाच्या दरात झालेली वाढ पुढीलप्रमाणे आहे. नव्या दरांनुसार गाईच्या दुधासाठी आता 46 रुपयांऐवजी 48 रुपये मोजावे लागणार आहेत. तर म्हशीचे दूध खरेदी करण्यासाठी 56 ऐवजी 58 रुपये मोजावे लागतील. 

टॅग्स :milkदूधMilk Supplyदूध पुरवठाMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे