शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: ...तर कोविशिल्डची लस ९० टक्के प्रभावी; अदर पूनावालांनी महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 06:50 IST

दोन ते तीन महिन्यांच्या अंतराने घेणे गरजेचे

नवी दिल्ली : कोविड-१९ साथीचा पुन्हा उद्रेक झाल्यानंतर भारतातील काही राज्यांतील स्थिती चिंताजनक होत असताना सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी महत्त्वपूर्ण माहिती देऊन मोठा दिलासा दिला आहे. दोन ते तीन महिन्यांच्या अंतराने लस दिल्यास कोविशिल्ड ही लस ९० टक्के प्रभावी असल्याचे चाचणीअंती आढळून आले आहे, असे त्यांनी सांगितले.कोविशिल्ड लसीच्या प्रभाव क्षमतेबाबत दोन समूहांवर करण्यात आलेल्या चाचणीच्या निष्कर्षात एका महिन्याच्या अंतराने एका समूहाला ही लस देण्यात आली असता ही लस ६० ते ७० टक्के प्रभावी असल्याचे आढळले. दुसऱ्या समूहाला दोन ते तीन महिन्यांच्या अंतराने देण्यात आली असता लस ९० टक्के प्रभावी आढळली.कोविशिल्ड लसीची एक मात्रा देण्यात आलेल्या पन्नास वर्षांखालील लोकांमध्ये लसीचा उत्तम प्रतिसाद दिसून आला. लसीच्या एका मात्रेने ७० टक्के लोक पूर्णत: सुरक्षित होतात; परंतु दुसरी मात्रा दीर्घकाळासाठी प्रतिकार क्षमता प्राप्त व्हावी म्हणून घेणे आवश्यक आहे.डोसमध्ये जास्त अंतर ठेवल्यास इतर लसीही चांगल्या प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.मागच्या महिन्यात लसीकरणावरील तज्ज्ञांच्या समितीच्या शिफारशीनुसार सरकारने लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढविले आहे. इतर देशांत पहिल्या डोसनंतर सहा आठवड्यांनी दुसरा डोस दिल्यास लसीची क्षमता वाढल्याचे चाचणीअंती आढळल्याने या समितीने दोन डोसमधील अंतर वाढविण्याची शिफारस केली होती.अदर पूनावाला यांनी सांगितले की, लसीच्या पहिल्या डोसनंतर प्रतिकार क्षमता वाढणे सुरू होते. पहिला डोस घेतलेल्या पन्नास वर्षांखाली लोकांतही लसीचा उत्तम प्रतिसाद आढळून आला. कोविड-१९ च्या संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांच्या तुलनेत मिळणारे संरक्षणही चांगले आहे. एका डोसनंतर ७० टक्के लोकांनाही या संसर्गापासून पूर्णत: सुरक्षित आहेत.दोन समूहांवरील चाचणीचा निष्कर्षदोन ते तीन महिन्यांच्या अंतराने लस दिल्यास कोविशिल्ड ही लस ९० टक्के प्रभावी असल्याचा दाेन समूहांवरील चाचणीचा निष्कर्ष आहे. सीरम व अमेरिकास्थित नोवाव्हॅक कंपनी संयुक्तपणे विकसित करीत असलेल्या कोवोवॅक्स लसीची चाचणी भारतात सुरू आहे. आफ्रिका, ब्रिटनमधील काेविड विषाणूविरुद्ध चाचणी घेतली असून ही लस ८९% प्रभावी असल्याचे आढळले. सप्टेंबर २०२१ पर्यंत ही लस आणण्याचा उद्देश आहे, असे पूनावाला म्हणाले. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस