कोर्ट ट्रायल नव्हे मिडीया ट्रायल , सनातनचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2016 19:24 IST2016-08-19T19:24:21+5:302016-08-19T19:24:21+5:30

सनातन संघटनेवर मागील अनेक दिवसांपासून होत असणारे आरोप बिनबुडाचे असून संस्थेच्या निरापराध साधकांना या सर्व प्रकरणात गोवण्यात आले असल्याचा आरोप करत

Court trial no media trials, Sanatan accuses | कोर्ट ट्रायल नव्हे मिडीया ट्रायल , सनातनचा आरोप

कोर्ट ट्रायल नव्हे मिडीया ट्रायल , सनातनचा आरोप

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १९ : सनातन संघटनेवर मागील अनेक दिवसांपासून होत असणारे आरोप बिनबुडाचे असून संस्थेच्या निरापराध साधकांना या सर्व प्रकरणात गोवण्यात आले असल्याचा आरोप करत याचा निषेध करण्यासाठी हिंदुत्त्ववादी संघटनांतर्फे याचा निषेध करण्यासाठी शनिवारी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंद दवे, हिंदु जनजागृती समितीचे पराग गोखले उपस्थित होते.

वर्तक म्हणाले, दाभोलकर हत्याप्रकरणी सनातनचे डॉ. तावडे यांना अटक करून ६० दिवस होत आले, तरी अद्याप अन्वेषण यंत्रणा त्यांच्याविरोधात भक्कम पुरावा सादर करू शकली नाही. मात्र केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांमध्ये निराधार बातम्या पेरल्या. पानसरे हत्या प्रकरणातही समीर गायकवाड यांच्यावरील खटला चालू करण्यास पानसरे कुटुंबियांकडून सातत्याने विरोध केला जात आहे. सनातनच्या निष्पाप साधकांना कारागृहात खितपत ठेवण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला. अन्वेषण यंत्रणा आपले अपयश झाकण्यासाठीच हे सर्व करत आहे.
मात्र सर्व हिंदुत्ववादी संघटनेवर होणाऱ्या अन्यायासंदर्भात जनक्षोभ आहे. तो व्यक्त करण्यासाठीच पुण्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

संस्थेवरील अन्यायाच्या विरोधात २० आॅगस्ट या दिवशी भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यानापासून सकाळी ८.३० वाजता या मोर्चाला प्रारंभ होईल. महाराणा प्रताप उद्यान, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, शगून चौक, ओंकारेश्ववर मंदिर ते शनिवारवाडा असे मार्गक्रमण करत ग्रामदैवत कसबा गणपती मंदिर येथे मोर्चाची सांगता होईल. यामध्ये ३० ते ४० संघटना सहभागी होणार असल्याचेही ते म्हणाले. पुण्याबरोबरच मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर या शहरांतही निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आलेआहे.

आनंद दवे म्हणाले, दाभोलकर कुटुंबियांकडून या घटनेतील आरोपींसाठी दिशा देण्याचा प्रयत्न होत आहे, हे अत्यंत चुकीचे आहे. अनिंस कडून करण्यात येणारी सनातन संघटनेच्या बंदीची मागणी चुकीची असून आमचा संस्थेला पूर्ण पाठिंबा आहे.
तपासयंत्रणांकडून अनेक महत्त्वाच्या गोष्टींकडे सोयीस्कररितीने दुर्लक्ष होत असून संस्थेच्या साधकांना तुरुंगात सडविण्याचा प्रयत्न हा मानहानी करणारा आहे. दाभोलकरांच्या ट्रस्टमधील आर्थिक घोटाळे आणि विदेशातून बेकायदेशीरपणे येणारा प्रचंड निधी यांमुळे दाभोलकरांची हत्या झाली आहे काय, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शासनाकडे करण्यात येणार असल्याचे वर्तक यांनी सांगितले. 

 
 
 

पुरोगाम्यांच्या दबावापोटी सनातनच्या साधकांना नाहक अडकवून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यात येत आहे. पानसरे हत्या प्रकरणात अटकेत असलेले सनातनचे साधक समीर गायकवाड यांच्यावरील खटला चालू करावा, अशी मागणी करूनही तो खटला चालूच केला जात नाही. सनातनला नाहक आरोपीच्या पिंजऱ्याात उभे केले जात आहे. आज सनातनची कोर्ट ट्रायल नाही, तर मिडिया ट्रायल चालू आहे.
अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था

Web Title: Court trial no media trials, Sanatan accuses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.