शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

Maratha Reservation: आरक्षणामध्ये अडसर न्यायालयीन निकालांचा, समितीच्या सल्लामसलतीत बाब समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 07:35 IST

राज्य सरकारने ओबीसीतून (कुणबी) मराठा समाजाला आरक्षण दिले तरी विविध न्यायालयांनी यापूर्वी दिलेल्या निकालाचा अडसर त्यात येऊ शकतो

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: राज्य सरकारने ओबीसीतून (कुणबी) मराठा समाजाला आरक्षण दिले तरी विविध न्यायालयांनी यापूर्वी दिलेल्या निकालाचा अडसर त्यात येऊ शकतो आणि हे आरक्षण न्यायालयीन लढाईत अडकू शकते अशी बाब या विषयावर कायदेशीर सल्लामसलत सध्या करत असलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या निदर्शनास आली आहे. उपसमिती सध्या वारंवार बैठका तर घेतच आहे शिवाय नामवंत विधिज्ञांचा सल्लादेखील घेत आहे, असा सल्ला घेताना या आधी अशा आरक्षणासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या निकालांकडे कायदेविषयकतज्ज्ञांनी उपसमितीचे लक्ष वेधले आहे. 

आणखी एका खटल्यात काय घडले?  आणखी एक प्रकरण उच्च न्यायालयात गेले. ते होते सुहास दशरथे विरुद्ध महाराष्ट्र सरकार. ६ ऑक्टोबर २००२ रोजी न्या. मार्लापल्ले आणि न्या. एन. व्ही. दाभोळकर यांनी त्यावर निकाल दिला. या निकालाच्या परिच्छेद ४६ मध्ये न्यायमूर्तिद्वयांनी असे म्हटले की,  या प्रकरणात  जात पडताळणी समितीकडे जी भूमिका मांडण्यात आली, ती स्वीकारली तर मराठा समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र द्यावे लागेल. आणि असे केले तर ते महाराष्ट्रातील वास्तविक सामाजिक व्यवस्थेच्या ते  (स्टार्क सोशल रियालिटीज) विरोधात असेल.

‘...तर तो सामाजिक मूर्खपणा ठरेल’ - बाळासाहेब रंगनाथ चव्हाण यांना जात पडताळणी समितीने २००१ मध्ये कुणबी प्रमाणपत्र दिले होते. त्यावर जगन्नाथ होले या व्यक्तीने तक्रार दाखल केली. मात्र, दाद न मिळाल्याने जगन्नाथ होले हे मुंबई उच्च न्यायालयात गेले. १७ ऑक्टोबर २००३ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. बी. एच. मार्लापल्ले आणि न्या. ए. एस. बग्गा यांनी निकाल दिला. 

- या आदेशातील परिच्छेद १७ मध्ये म्हटले आहे की, या प्रकरणात सदर प्रमाणपत्र मान्य केले तर महाराष्ट्रात संपूर्ण मराठा समाज हा कुणबी म्हणून स्वीकारावा लागेल आणि असे झाले तर तो सामाजिक मूर्खपणा (सोशल ॲब्सर्डिटी) ठरेल.

- उच्च न्यायालयाच्या या निकालाविरोधात बाळासाहेब चव्हाण हे सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. बी. एन. अग्रवाल आणि न्या. पी. के. बालसुब्रह्मण्यम यांच्या खंडपीठाने १५  एप्रिल २००५ रोजी निकाल देताना सांगितले की, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य आहे, त्यात हस्तक्षेप करण्याची आम्हाला गरज वाटत नाही. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील