न्यायालयाने फेटाळली भगतसिंह कोश्यारी यांच्या २०२२ मधील निर्णयाला आव्हान देणारी याचिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 07:23 IST2025-01-10T07:23:19+5:302025-01-10T07:23:56+5:30
'याचिका निराधार आहे', असे निरीक्षण नोंदवून मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळली

न्यायालयाने फेटाळली भगतसिंह कोश्यारी यांच्या २०२२ मधील निर्णयाला आव्हान देणारी याचिका
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: तत्कालीन मविआ सरकारने राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी सुचवलेल्या १२ जणांची नावे मागे घेण्याच्या तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या २०२२ च्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली.
‘याचिका निराधार आहे. त्यामुळे ती फेटाळण्यात येत आहे,’ असे मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने म्हणत उद्धव ठाकरे गटाचे नेते सुनील मोदी यांची याचिका फेटाळली. मविआ सरकारने राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्त करण्यासाठी सुचविलेली १२ नावे मागे घेण्यासंदर्भात शिंदे सरकारने केलेली शिफारस कोश्यारी यांनी ५ सप्टेंबर २०२२ रोजी मान्य केली.