शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

अनिल देशमुख यांना न्यायालयाचा दिलासा; सीबीआय कोठडीची मागणी फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 10:34 IST

सहआरोपी संजीव पालांडे, कुंदन शिंदे आणि सचिन वाझे यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी न करता सीबीआयने देशमुख यांना आणखी तीन दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली. मात्र...

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय कोठडीची मुदत वाढविण्याची मागणी फेटाळून लावत विशेष सीबीआय न्यायालयाने शनिवारी त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे देशमुख यांना काहीअंशी दिलासा मिळाला असून, येत्या २९ एप्रिलपर्यंत त्यांच्यासह अन्य तीन आरोपींची रवानगी न्यालयीन कोठडीत केली जाणार आहे.भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली  देशमुखांची सीबीआय चौकशी सुरू आहे. त्यांच्या सीबीआय कोठडीचा कालावधी १६ एप्रिलला संपुष्टात येत असल्याने तीन दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी सीबीआयने केली होती. परंतु, न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावली. ‘सीबीआयला देशमुखांची कोठडी मंजूर केली हाेती. आणखी मुदत वाढविण्यामागे ठोस कारण दिसून येत नाही. त्यामुळे हे न्यायालय त्यांच्या सीबीआय कोठडीत वाढ करण्यात इच्छुक नाही. सध्या देशमुख यांच्यासह अन्य आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची गरज आहे’, असे मत विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश डी. पी. शिंगाडे यांनी व्यक्त केले.

न्यायालयीन काेठडी -सहआरोपी संजीव पालांडे, कुंदन शिंदे आणि सचिन वाझे यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी न करता सीबीआयने देशमुख यांना आणखी तीन दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली. मात्र, सीबीआयची याचिका फेटाळून लावत न्यायालयाने चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.

न्यायालयात काय झाले? - सीबीआयचे प्रतिनिधीत्व करणारे विशेष सरकारी वकील रतनदीप सिंग यांनी न्यायालयाला सांगितले की, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि मोक्याच्या जागी नियुक्तीसाठी पैसे घेतल्याच्या आरोपांबाबत देशमुख यांची अधिक चौकशी करायची आहे. त्यातून अन्य आरोपींची नावे उघड होऊ शकतात. त्यामुळे आणखी तीन दिवस सीबीआय कोठडीची मुदत वाढविण्याची मागणी त्यांनी केली.- देशमुख यांचे वकील अनिकेत निकम यांनी मात्र त्यास विरोध केला. देशमुख आणि सहआरोपींची समोरासमोर चौकशी करण्यासाठी मागील सुनावणीवेळी मुदतवाढ मागण्यात आली होती. तपास यंत्रणेने कितीवेळा तशी चौकशी केली, याचा खुलासा न्यायालयासमोर करावा.- अन्य आरोपींची कोठडी न मागता केवळ देशमुख यांचीच कोठडी सीबीआय मागत आहे. गेल्या अकरा दिवसांपासून ते सीबीआय कोठडीत असून, क्षुल्लक कारणावरून एका ७३ वर्षीय व्यक्तीची कोठडी वाढविण्याची मागणी केली जात आहे. देशमुख यांची प्रकृती लक्षात घेता, त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवायला हवे, असा युक्तिवाद निकम यांनी केला.- दरम्यान, दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश डी. पी. शिंगाडे यांनी उपरोक्त निकाल दिला.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखNCPराष्ट्रवादी काँग्रेसCBIगुन्हा अन्वेषण विभाग