शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! गळफास घेतलेल्या युगुलाचे लग्न लावून केले अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 13:23 IST

Love News: मोलमजुरी करणाऱ्या गरीब कुटुंबातील त्या दोघांनी एकमेकांवर प्रेम केले. पण त्याची घरच्यांना अजिबात कल्पना नव्हती. इथे जातीचा विषय नव्हता पण...

भडगाव (जि. जळगाव) : मोलमजुरी करणाऱ्या गरीब कुटुंबातील त्या दोघांनी एकमेकांवर प्रेम केले. पण त्याची घरच्यांना अजिबात कल्पना नव्हती. इथे जातीचा विषय नव्हता पण बोलण्याचे धाडस न दाखवल्याने मुलासाठी वधू संशोधन सुरू झाले तेव्हा आता आपले लग्न होणार नाही, या विचाराने दोघांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कळली तेव्हा दोन्ही कुटुंबीयांनी या दोघांच्या प्रेमाला मूकसंमती दिली आणि अंत्यविधी करण्यापूर्वी दोघांचे लग्न लावून त्यांच्या आत्म्याची शांती केली. वाडे (ता. भडगाव) येथे रविवारी हा प्रकार घडला.मुकेश कैलास सोनवणे (२२) व नेहा बापू ठाकरे (१९) असे या प्रेमीयुगुलाचे नाव आहे. मुकेश हा वाडे गावातच तर नेहा गावाबाहेरच्या वस्तीत मामाकडे राहत होती. पाळत ता. मालेगाव येथे राहणारे तिचे आई-वडीलही गेल्या सात-आठ महिन्यांपूर्वीच वाडे येथे रहायला आले होते.या दोघांचे काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. यात मुकेश याला पाहण्यासाठी रविवारीच पाहुणे येणार होते. त्यामुळे आपले लग्न होणार नाही, या समजातून रविवारी सकाळी दोघांनी वाडे येथे माध्यमिक विद्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील जिन्याच्या लोखंडी आसारीला दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.वाडे येथील पोलीस पाटील अरविंद फकिरा पाटील यांनी भडगाव पोलीस स्टेशनला माहिती दिली. वाडे येथे दुपारी २.४० वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी मुकेश व नेहा यांचे समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे लग्न लावण्यात आले. यावेळी दोघाच्या नातेवाइकांनी एकच हंबरडा फोडला. गावात वातावरण सुन्न झाले होते. 

दोघांचेही आईवडील  प्रेमाबाबत अनभिज्ञ दोघांचे एकमेकांवर प्रेम असल्याचे आम्हाला माहिती नव्हते, अशी माहिती दोघांच्याही आईवडिलांनी पोलिसांना दिली. मुकेश याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण तर नेहा हिच्या पश्चातही आई-वडील, भाऊ,बहीण असा परिवार आहे. मयत प्रेमी युगुल हे एकाच समाजाचे आहेत.  दोघांच्या कुटुंबाची परिस्थिती जेमतेम आहे. मोलमजुरी करुन ते संसार चालवितात. या घटनेने त्यांच्या कुटुंबाला धक्का बसलाआहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वाडे येथे पोहचत पंचनामा केला. पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.

टॅग्स :marriageलग्नDeathमृत्यू