शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

जरांगे फॅक्टरला उत्तर, भाजपचा प्लान ठरला; मराठवाड्यातील १६ पैकी किती ठिकाणी मराठा उमेदवार दिले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 18:02 IST

Vidhan Sabha Election विधानसभेसाठी काल ९९ उमेदवारांची पहिली उमेदवार यादी जाहीर केली असून यामध्ये मराठवाड्यातील १६ जागांचा समावेश आहे.

BJP Candidate List ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेचा मराठवाड्यात सत्ताधारी महायुतीला मोठा फटका बसला होता. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर वगळता अन्य सर्व मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार पराभूत झाले. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा फटका  बसू नये, यासाठी भाजपकडूनही मोर्चेबांधणी करण्यात आल्याचं दिसत असून याचे प्रतिबिंब भाजपच्या पहिल्या उमेदवारी यादीतही पाहायला मिळाले. भाजपने विधानसभेसाठी काल ९९ उमेदवारांची पहिली उमेदवार यादी जाहीर केली असून यामध्ये मराठवाड्यातील १६ जागांचा समावेश आहे. या १६ पैकी १० जागांवर भाजपने मराठा उमेदवार दिले आहेत.

आरक्षण आंदोलनामुळे मराठवाड्यातील सामाजिक वातावरण ढवळून निघालं आहे. लोकसभा निवडणुकीत झालेलं जातीय ध्रुवीकरण लक्षात घेता भाजपने विधानसभा निवडणुकीत सर्वसाधारण मतदारसंघांमध्ये मराठा उमेदवारांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत आहे. भाजपने काल जाहीर केलेल्या १६ पैकी तीन जागा या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. अन्य १३ मतदारसंघांपैकी १० मतदारसंघांमध्ये पक्षाने मराठा उमेदवार दिले असून उर्वरित तीन मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघांमध्ये ओबीसी तर एका मतदारसंघात जैन उमेदवाराला संधी दिली आहे.

मराठवाड्यातील कोणत्या मराठा उमेदवारांना भाजपकडून उमेदवारी?

हिंगोली - तानाजी मुटकुळेतुळजापूर - राणाजगजीतसिंह पाटीलजिंतूर - मेघना बोर्डीकरनायगाव - राजेश पवारभोकर - श्रीजया चव्हाणफुलंब्री - अनुराधा चव्हाणभोकरदन - संतोष दानवेपरतूर - बबनराव लोणीकरऔसा - अभिमन्यू पवारनिलंगा - संभाजी पाटील निलंगेकर

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकBJPभाजपाManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस