कापसाचे उत्पादन घटले !
By Admin | Updated: November 9, 2014 23:47 IST2014-11-09T23:43:45+5:302014-11-09T23:47:54+5:30
पश्चिम विदर्भात हेक्टरी चार ते पाच क्विंटलचाच उतारा
_ns.jpg)
कापसाचे उत्पादन घटले !
अकोला : उशिराने आलेला मान्सून आणि पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने िपकांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यामुळे राज्यात कापसाचे उत्पादन ३0 ते ४0 टक्के कमी होण्याची शक्यता आहे. विदर्भात हेक्टरी केवळ चार ते पाच िक्ंवटलचाच उतारा असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
राज्यात कापसाचे जवळपास ४0 लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी विदर्भात १७ लाख, मराठवाड्यात १५ लाख, आणि उर्वरित क्षेत्र खान्देशात आहे. यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाल्याने शेतकर्यांनी २३ जुलैनंतर पेरणीला सुरुवात केली. बीटी कापूस पेरणीची वेळ १५ जुलैपर्यंत होती; तथापि शेतकर्यांनी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात बीटीची पेरणी केली. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने का पसाच्या झाडांची वाढ खुंटली. या अपरिपक्व कापसाच्या झाडाला फुलोरा येण्यास सुरू वात झाली होती. त्याचा परिणाम कापूस उत्पादनावर झाला.
गतवर्षी कापसाला अतवृष्टीचा फटका बसेल, असे वाटले होते; मात्र जवळपास ३७0 लाख गाठींचे उत्पादन झाले. ११0 लाख गाठींची निर्यातही झाली होती. विदर्भाचा विचार केल्यास यंदा कापसाचे सर्वाधिक १0 लाख हेक्टर क्षेत्र पश्चिम विदर्भात आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती जिल्हा सोडला तर अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या चार जिल्हय़ांत सरासरी ४0 टक्के पाऊस कमी झाला आहे. त्याचा परिणाम कापूस पिकावर झाला आहे.
उशिरा पेरणी झाल्यामुळे नैसर्गिकरित्याच कमी उत्पादनाची शक्यता असते. यावर्षी उशिरा पेरणी झाली. शिवाय ऐन पीक वाढीच्या काळात पावसाचा खंड पडला. परतीच्या पावसानेही धोका दिला. त्यामुळे यंदा कापूस उत्पादनात घट अ पेक्षितच असल्याचे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कापूस संशोधक डॉ. टी. एच. राठोड यांनी स्पष्ट केले.