शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जलजीवन योजनेमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार, संसदेत योजनेच्या अपयशावर विशाल पाटलांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 15:58 IST

युद्धामुळे गॅस मिळत नाही तर किमान इलेक्ट्रिक शेगडी द्या

सांगली : जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. ही योजना केंद्र सरकारच्या भ्रष्टाचाराचे जिवंत नव्हे तर मृत उदाहरण म्हणायला हवे. केंद्र शासनाने जलजीवन योजनेतील घोटाळेबहाद्दरांकडे पूर्णता दुर्लक्ष केल्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करुन ही नागरिकांना पाणी मिळत नाही, अशी भीषण चित्र ग्रामीण भागात दिसत आहे, अशी जोरदार टीका सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी संसदेत केली.विशाल पाटील म्हणाले, जलजीवन मिशन ही सपशेल अपयशी योजना आहे. देशात या योजनेत फार मोठा भ्रष्टाचार झाला आहे. दोन वर्षांत या योजनेवर एक रुपयाची तरतूद केलेली नाही. भ्रष्टाचार रोखायच्या नावाखाली तरतूदच थांबवली आहे. ७० हजार कोटींची तरदूत केली होती, मात्र रुपयाचा खर्च होताना दिसत नाही. आता म्हणतात योजना २०२८ पर्यंत वाढवू. या योजनांवर कुणाचेही नियंत्रण नाही. अर्थसंकल्पाच्या पुरवणी मागण्यांमध्ये तीन लाख कोटी रुपयांच्या बदलाचा प्रस्ताव अर्थमंत्र्यांनी आणला आहे. जवळपास १० टक्के बदलाचा प्रस्ताव आहे. इतके सारे तज्ज्ञ लोक नॉर्थ ब्लॉकमध्ये बसून अर्थसंकल्पाचे नियोजन करतात, मग त्यात १० टक्के बदलाची वेळ काय येते? मला शंकाच येते, कुठे नियोजनात कमी आहे का? जाणीवपूर्वक काही गोष्टींचा समावेश केला आहे का?, जिथे खर्चच करायचा नाही, मात्र उगीच तरतूद दाखवली आहे. भारतीयांचे सरासरी मासिक उत्पन्न सहा वर्षातील निच्चांकी स्तरावर आहे. बेरोजगारीचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. तरुणाई आपली ताकद असायला हवी होती, ती कमजोरी झाली आहे.मनरेगात खर्च पूर्ण होताना दिसत नाही. शंभर दिवसांचे काम कुणालाही मिळालेले नाही. पैसेच मिळत नाहीत. या विषयाचे मंत्रालय नेमके करते काय? शेतकऱ्यांना महिना दोन हजार रुपये देतात, मात्र खते, मशागती, औषधांसह शेती उत्पादन खर्च किती वाढलाय, याचा अभ्यास केला आहे का, अशी टीकाही त्यांनी केली.

नागरिकांना किमान इलेक्ट्रिक शेगडी तर द्याविशाल पाटील यांनी युद्धात अडकलेल्या लोकांबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपली कोणतीच तयारी दिसत नाही. आपले लोक युद्ध सुरु असलेल्या देशांत अडकले आहेत. त्यांना परत आणायची व्यवस्था करा. युद्धामुळे गॅस मिळत नाही तर काही व्यवस्था करा. किमान इलेक्ट्रिक शेगडी द्या, लोक स्वयंपाक करून खातील.

English
हिंदी सारांश
Web Title : Jal Jeevan Mission faces corruption allegations, MP Vishal Patil criticizes scheme.

Web Summary : MP Vishal Patil slams Jal Jeevan Mission in Parliament, alleging crores in corruption. He criticizes the scheme's failure to provide water despite massive spending, highlighting broader economic concerns like unemployment and farmers' struggles.