त्या नगरसेवकाची शिवसेनेतून हाकलपट्टी
By Admin | Updated: January 24, 2017 17:59 IST2017-01-24T17:59:35+5:302017-01-24T17:59:35+5:30
शिवसेनेचा दहिसरमधील अंतर्गत कलह चांगलाच चिघळला आहे. आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची शिवसेनेतून हाकलपट्टी केरण्यात आली आहे

त्या नगरसेवकाची शिवसेनेतून हाकलपट्टी
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - शिवसेनेचा दहिसरमधील अंतर्गत कलह चांगलाच चिघळला आहे. आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची शिवसेनेतून हाकलपट्टी केरण्यात आली आहे. डॉ. शुभा राऊळ, शीतल म्हात्रे, अवकाश जाधव या सेना नगरसेवकांविरूद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार त्यांनी केली होती व ती तक्रार मागे घेण्याचे आदेश पक्षातर्फे देण्यात आले होते. पण अभिषेक यांनी पक्षाचा आदेश धुडकावत तक्रार मागे न घेतल्यामुळे त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
अभिषेक घोसाळकर यांनी शुभा राऊळ, शीतल म्हात्रे आणि अवकाश जाधव यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या तक्रारीमुळे तीनही उमेदवारांची उमेदवारी धोक्यात आली आहे.