शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: EMI ची वसुली काही महिन्यांसाठी थांबणार? पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आग्रही मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 19:59 IST

रिझर्व्ह बँकेने अशा प्रकारचे बँकांचे हप्ते वसुली थांबवावे आणि कोरोनामुळे त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा द्यावा.

मुंबई: कोरोनामुळे बाजरापेठा बंद झालेल्या आहेत. कंपन्यांचे कामही थांबलेले आहे. अनेक कंपन्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींयच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोणाचा पगार कापणार नाही याची शाश्वती दिलेली आहे. असे असताना नोकरदार वर्गामध्ये एक मोठा भीती आहे. समजा पगार झाला नाही, किंवा रोजगार गेला तर घर, वाहन, घरातील वस्तूंचे हप्ते कसे फेडायचे? घरखर्च कसा चालवायचा? यामुळे त्यांचे EMI, इन्स्टॉलमेंट तात्पुरते थांबविण्याची मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. 

रिझर्व्ह बँकेने अशा प्रकारचे बँकांचे हप्ते वसुली थांबवावे आणि कोरोनामुळे त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा द्यावा. केंद्र सरकारने असे आदेश रिझर्व्ह बँकेला द्यावेत, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. कर्जाचे हप्ते, कॅश क्रेडिटचे व्याज, क्रेडिट कार्डांची बिले आदींचे हप्ते तात्पुरते थांबवावेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी तसे पत्र पाठवून केंद्राला शिफारस करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 

य़ाचबरोबर अशोक चव्हाणांनी राज्यातील नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व खासगी आस्थापना बंद करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक सेवा म्हणून बँका भलेही सुरु असतील. पण उद्योग-व्यवसाय सारे ठप्प असल्याने पैशांची देवाणघेवाण थांबली आहे. याचा सामाजिक हिताचा विचार करून हा निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. एकजरी कर्जाचा हप्ता चुकला तरीही त्याचा थेट परिणाम त्या व्यक्तीच्या सिबिल स्कोअरवर होतो. यामुळे त्याला पुन्हा गरजेला कर्ज मिळणार नाही. या अडचणीचा प्रामुख्याने विचार करावा अशी विनंतही त्यांनी केली आहे. याचबरोबर जीएसटी, आयकर भरण्याची मुदतही वाढवावी अशी विनंती केली आहे.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणNarendra Modiनरेंद्र मोदीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकBanking Sectorबँकिंग क्षेत्र