Coronavirus Update : राज्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक; ४ हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 10:23 PM2021-09-15T22:23:46+5:302021-09-15T22:24:29+5:30

Coronavirus Cases In Maharashtra : गेल्या चोवीस तासांत ४ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची कोरोनावर मात.

Coronavirus Update More coronavirus free patients in the state More than 4000 corona free | Coronavirus Update : राज्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक; ४ हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्त

Coronavirus Update : राज्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक; ४ हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्त

Next
ठळक मुद्देगेल्या चोवीस तासांत ४ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची कोरोनावर मात.

सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली, तरी धोका अद्यापही पूर्णपणे टळला नाही. अशातच सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचीदेखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु दुसरीकडे सकारात्मक बाब म्हणजे गेल्या चोवीस तासांत राज्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचं दिसून आलं. ४ हजारांपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

गेल्या चोवीस तासांत राज्यात ४ हजार ३६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर दुसरीकडे ३ हजार ७८३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत ५२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंदही करण्यात आली आहे. सध्या राज्यात ४९ हजार ०३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 
मुंबईतही कोरोनामुक्त रुग्ण अधिक
गेल्या चोवीस तासांत मुंबईतही कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक होती. गेल्या चोवीस तासांत मुंबईत ६०४ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर ५१४ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या मुंबईत ४,६०२ रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण दुपटीचा कालावधी आता १२७७ दिवस इतका झाला आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus Update More coronavirus free patients in the state More than 4000 corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app