CoronaVirus Union Minister Nitin Gadkari tested positive for Corona | CoronaVirus News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोरोना पॉझिटिव्ह; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन

CoronaVirus News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोरोना पॉझिटिव्ह; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन

मुंबई: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना कोरोनाची लागण झाली आहे. गडकरींनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि प्रोटोकॉलचं पालन करावं, असं आवाहन त्यांनी ट्विटरवरून केलं आहे. गडकरी सध्या विलगीकरणात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याआधी गृहमंत्री अमित शहांसह केंद्रातल्या अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.'काल मला अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेतली. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. माझी प्रकृती आता चांगली आहे. तुमचे आशीर्वाद आणि सदिच्छा माझ्यासोबत आहेत. मी सध्या विलगीकरणात आहे,' असं गडकरींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि नियमांचं पालन करावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. 

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus Union Minister Nitin Gadkari tested positive for Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.