Coronavirus : तिसरी लाट सुसाट! राज्यात एकाच दिवशी ३९०० रुग्ण;  घरातच साजरा करा थर्टी फर्स्ट, सांस्कृतिक कार्यक्रमांना मनाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 06:54 AM2021-12-30T06:54:43+5:302021-12-30T06:55:10+5:30

Coronavirus: कोरोनाच्या मागील दोन लाटांच्या तुलनेत हे प्रमाण चिंताजनक असले तरीही रुग्णालयात दाखल करावे लागणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी असल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे. 

Coronavirus: Third Wave! 3900 patients in a single day in the state of Maharashtra, Celebrate Thirty First at home | Coronavirus : तिसरी लाट सुसाट! राज्यात एकाच दिवशी ३९०० रुग्ण;  घरातच साजरा करा थर्टी फर्स्ट, सांस्कृतिक कार्यक्रमांना मनाई

Coronavirus : तिसरी लाट सुसाट! राज्यात एकाच दिवशी ३९०० रुग्ण;  घरातच साजरा करा थर्टी फर्स्ट, सांस्कृतिक कार्यक्रमांना मनाई

Next

मुंबई : वर्षाखेरीस पुन्हा एकदा राज्यासह मुंबईत कोरोनाने डोके वर काढले आहे. दैनंदिन रुग्णसंख्येची संख्येची दोनशेपर्यंत झालेली घसरण आता तेराशेच्या पार गेली आहे. मुंबईत अवघ्या चार दिवसांत दैनंदिन रुग्णसंख्या ६८३ वरुन १,३७७ झाली आहे. कोरोनाच्या मागील दोन लाटांच्या तुलनेत हे प्रमाण चिंताजनक असले तरीही रुग्णालयात दाखल करावे लागणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी असल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे. 

मुंबई महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, कोरोनाच्या पहिल्या लाटेत मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या ७०६ वरुन १,३७६ वर जाण्यास १२ दिवसांचा कालावधी लागला. तर दुसऱ्या लाटेत ६८३ असणाऱ्या दैनंदिन रुग्णसंख्या १,३२५ वर पोहोचण्यासाठी २० दिवसांचा कालावधी लागला होता. मात्र २०२१ च्या अखेरीस येऊ घातलेल्या तिसऱ्या लाटेत कमी कालावधीत रुग्ण वाढत असल्याचे दिसून आले आहे.


मुंबईत ५ हजारांहून अधिक, तर ठाण्यात १,५०२ सक्रिय रुग्ण 
मुंबईत सध्या ५ हजार ८०३ रुग्ण उपचाराधीन आहेत, तर मुंबईत अन्य कारणांमुळे ओढावलेल्या मृत्यूंची संख्या २,५६३ आहे. तर ठाणे जिल्ह्यात सध्या १,५०२ सक्रिय रुग्ण आहेत. रायगड जिल्ह्यात २९६ रुग्ण सक्रिय आहेत.

मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सतर्क राहा. घाबरून जाऊ नका. आपल्या सुरक्षेसाठी शिस्त पाळा. मुंबईतील हॉटेल्सना ५० टक्के क्षमतेने  सुरू राहण्याची परवानगी आहे. हॉटेल्स आणि बंदिस्त ठिकाणी असलेल्या कार्यक्रमावर  लक्षात ठेवण्यासाठी भरारी पथक कार्यरत आहेत. तसेच सीसीटीव्ही फुटेजही मागवण्यात येतील.
- इकबाल सिंह चहल, आयुक्त, मुंबई महापालिका

दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असली तरीही रुग्णालयात दाखल होण्याची गरज लागणाऱ्या बाधितांचे प्रमाण कमी आहे. खबरदारी म्हणून कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. लक्षणे जाणवल्यास निदान, विलगीकरण आणि उपचारांना प्राधान्य द्या. सध्या संसर्गाच्या स्थितीचे विश्लेषण करण्यासाठी १५ जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. त्यानंतर अचूक व शास्त्रीय पद्धतीने तिसऱ्या लाटेचे विश्लेषण करता येईल.
- डॉ. अविनाश सुपे, राज्य कोरोना टास्क फोर्स

 

Web Title: Coronavirus: Third Wave! 3900 patients in a single day in the state of Maharashtra, Celebrate Thirty First at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.