शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

CoronaVirus News: ...तर पुन्हा कठोर लॉकडाऊन; 'पुनश्च हरीओम'चा नारा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा जनतेला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 4:32 PM

CoronaVirus News: 'मिशन बिगिन अगेन' अंतर्गत दिलेल्या सवलतींनंतर नागरिकांची रस्त्यावर झुंबड

मुंबई: आता आपल्याला कोरोनासोबत जगायचं असल्यानं लॉकडाऊन टप्प्याटप्प्यानं हटवण्यात येत आहे. काही गोष्टी अंगवळणी पडायला हव्यात यासाठी निर्बंध हळूहळू शिथिल केले जात आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. पुनश्च हरिओम म्हणून आपण काही सवलती दिल्या. मात्र त्या देताच सगळ्यांचीच रस्त्यावर झुंबड उडाली. सरकार देत असलेली ही उघडीप जीवघेणी ठरत असल्यास पुन्हा कठोर लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला. ते आज पत्रकारांशी बोलत होते. आपल्याला कोरोनासोबत अतिशय सावध राहून जगावं लागणार आहे. त्यामुळेच सरकार अतिशय सावधपणे पावलं टाकत आहे. आपण कोणतीही घाई करत नाही. टप्प्याटप्प्यानं आपण लॉकडाऊन लागू केला. आता टप्प्याटप्प्यानं आपण निर्बंध शिथिल करत आहोत. सकाळी व्यायाम करण्यासाठी, फिरण्यासाठी सवलत दिली आहे. मात्र ही सवलत देताच रस्त्यांवर गर्दी झाली. ही गर्दी टाळायला हवी. जर लोकांनी गर्दी करणं कमी केलं नाही, जी शिथिलता आहे त्यातून नुकसान होत आहे हे लक्षात आलं तर नाइलाजाने पुन्हा कठोर लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.मुंबईतील लोकलसेवा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत असल्याची माहिती त्यांनी दिली. जीवनावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्राकडे लोकलची मागणी केली आहे. लोकलसेवा सुरू नसल्यानं रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर जाता येत नाही. लोकलसेवा सुरू झाल्यास त्यांना रुग्णालयात जाणं शक्य होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमधील भोंगळ कारभार समोर आला आहे. शताब्दी रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या वृद्धाचा मृतदेह बोरिवली रेल्वे स्थानकात आढळून आला. त्याबद्दल प्रश्न विचारला असता, सरकार कोरोनाविरुद्धची लढाई गांभीर्यानं लढत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. सरकार गंभीर नसतं, तर देशातील सर्वोत्तम आरोग्य सुविधा उभारल्या गेल्या नसत्या, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलं.कोकणात चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांना दिलासा, अजित पवारांनी केल्या मोठ्या घोषणाअधिवेशन 3 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला पाठिंबाः देवेंद्र फडणवीस ‘या’ तारखेपासून राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार; सूत्रांची माहिती

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरे