शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

Coronavirus: खासगी लॅबमधील कोरोना चाचणीचे दर ५० टक्क्यांनी कमी; राज्य सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 3:30 PM

सरकारकडून कोरोना चाचणी निशुल्क दरात करण्यात येत असली तरी काही खासगी लॅबना कोरोना चाचणी करण्याची परवानगी सरकारने दिली होती, मात्र या चाचणीचे दर साधारणपणे ४ हजार ४०० रुपयांपर्यंत होते

ठळक मुद्देसर्वसामान्य रुग्णांना चाचणीचे दर परवडण्यासाठी राज्य सरकारने समिती गठित केली होतीखासगी लॅबमध्ये कोरोना चाचणी करण्यासाठी ४ हजार ४०० रुपये घेण्यात येत होतेजास्तीत जास्त चाचण्या होण्यासाठी खासगी प्रयोगशाळांसोबत वाटाघाटी करुन कमीतकमी दर निश्चित

मुंबई – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसनं जगातील बहुतांश देशावर थैमान घातलं आहे. भारतात ३ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर ८ हजारापेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सर्वाधित कोरोनाबाधित महाराष्ट्रात असून राज्यात आतापर्यंत १ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर ३ हजारापेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सरकारकडून कोरोना चाचणी निशुल्क दरात करण्यात येत असली तरी काही खासगी लॅबना कोरोना चाचणी करण्याची परवानगी सरकारने दिली होती, मात्र या चाचणीचे दर साधारणपणे ४ हजार ५०० ते ५ हजार ६०० रुपयांपर्यंत होते, सर्वसामान्य रुग्णांना चाचणीचे दर परवडण्यासाठी राज्य सरकारने समिती गठित केली होती, खासगी लॅब आणि राज्य सरकार यांच्यात झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर आता खासगी लॅबमधील कोरोना चाचणीचे जवळपास निम्म्याने कमी करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

यापूर्वी खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणी करण्यासाठी ४ हजार ५०० रुपये घेण्यात येत होते, मात्र आता कोरोना चाचणीचे दर २ हजार २०० रुपये निश्चित करण्यात आले आहेत. तर घरातून चाचणीचे नमुने घेऊन जाण्यासाठी २ हजार ८०० रुपये मोजावे लागणार आहेत. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्यात कोविड १९ चा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता आयसीएमआरने आरटी पीसीआर तपासणीची सुविधा असलेल्या एकूण ४४ शासकीय आणि ३६ खासगी प्रयोगशाळांना कोरोना चाचणी करण्याची परवानगी दिली आहे. याबाबत प्रयोगशाळानिहाय तपासणी क्षमता, तपासणीचा भर या सर्व बाबींचा आढावा मुख्य सचिवांकडून घेण्यात आला होता. शासकीय प्रयोगशाळेत कोविड १९ ची तपासणी निशुल्क करण्यात येत आहे. पण खासगी प्रयोगशाळेत कोविड १९ तपासणीसाठी लोकांना ४ हजार ५०० रुपये मोजावे लागत होते.

या खासगी प्रयोगशाळेतील चाचणी दरात वाटाघाटी करुन राज्यात कोविड १९ तपासणीचा निश्चित दर ठरवण्यात येणार होता. राज्यातील प्रयोगशाळा पूर्ण क्षमतेने वापरण्यासाठी आणि जास्तीत जास्त चाचण्या होण्यासाठी खासगी प्रयोगशाळांसोबत वाटाघाटी करुन कमीतकमी दर निश्चित करण्यासाठी शासनाने समिती गठीत केली होती. राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ४ जणांची समिती गठीत करण्यात आली होती, यात अजय चंदवाले, अमिता जोशी, आरोग्य सेवा आयुक्तालय संचालक यांचा समावेश होता. या समितीच्या प्रयत्नानंतर ही चाचणी दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याState Governmentराज्य सरकार