Coronavirus : कोरोनासाठी चाचणी केंद्रे, प्रयोगशाळा वाढवा-मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 06:24 AM2020-03-21T06:24:42+5:302020-03-21T06:25:16+5:30

चाचणी केंद्रे आणि प्रयोगशाळा यांच्या सध्याच्या क्षमतेत वाढ करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधताना सांगितले.

Coronavirus: Testing centers & laboratory expand for Corona Test -CM | Coronavirus : कोरोनासाठी चाचणी केंद्रे, प्रयोगशाळा वाढवा-मुख्यमंत्री

Coronavirus : कोरोनासाठी चाचणी केंद्रे, प्रयोगशाळा वाढवा-मुख्यमंत्री

Next

मुंबई : कोरोना साथीच्या रोगाचा महाराष्ट्र जोमाने मुकाबला करीत आहे. सध्या या रोगाच्या दुसऱ्या टप्यातील संक्रमण अवस्थेत आपण आहोत. तिस-या टप्यात न जाण्यासाठी आपल्याला उपाययोजनांची गती वाढवावी लागेल, विशेषत: चाचणी केंद्रे आणि प्रयोगशाळा यांच्या सध्याच्या क्षमतेत वाढ करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधताना सांगितले.
पंतप्रधान मोदी यांनी देशातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये पहिल्यांदा बोलण्याची संधी दिली.

पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूच्या केलेल्या आवाहनाचा सकारात्मक परिणाम झाला आहे. महाराष्ट्र शासनाने देखील वेळीच पावले उचलून कोरोनाचे संक्रमण अधिक वाढू नये यासाठी प्रयत्न केले आहेत, रूग्णांची संख्या कमी दिसत असली तरी या रोगाच्या फैलावाचे स्वरूप पाहता भ्रमात राहण्यात अर्थ नाही, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

२२ मार्च पासून आंतरराष्ट्रीय विमाने बंद करण्यात येणार आहेत. तोपर्यंत २० ते २५ हजार प्रवासी देशात-राज्यात परततील. या प्रवाशांचे क्वारंटाईन करावे लागेल किंवा त्यांच्यावर उपचार करावे लागतील. त्यादृष्टीने सुविधा वाढविण्याची गरज आहे. मुंबई-पुणे-नागपूर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर उतरलेले परदेशातून आलेले प्रवासी मिळेल त्या वाहनांनी आपापल्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतील, त्यांना रोखण्याचे आव्हान आपल्यासमोर असेल. यावर उपाय शोधण्याची गरज आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सुचविले.

प्रसंगी लष्करी रुग्णालयांची मदत
या घडीला सर्व वैद्यकीय सुविधा राज्यात उपलब्ध आहेत परंतु पुढील काळात क्वारंटाईनसाठी जादा सुविधा लागतील. औषधी, व्हेंटिलेटर्सची तसेच उपचारांसाठी रूग्णालयांची गरज भासेल. यासाठी लष्करी रूग्णालयांची प्रसंगी मदत घ्यावी लागेल, याविषयी उपाययोजना करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली.

Web Title: Coronavirus: Testing centers & laboratory expand for Corona Test -CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.