शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: केवळ 10-15 दिवसच काळजी घ्या, होळीला सावध रहा; उद्धव ठाकरेंचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 18:36 IST

Coronavirus कोरोना व्हायरसचे रुग्ण भारतात सापडल्याने खळबळ उडाली आहे. दिल्लीमध्ये तपासणीसाठी रांगा लागल्या आहेत.

ठळक मुद्देआज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. राज्यात होळीचा सण साजरा केला जाणार आहे.मास्क लावण्याची गरज नाही.

मुंबई : राज्य सरकार आणि महापालिका हाय अलर्टवर ठेवण्यात आल्या असून आपल्याला फक्त पुढचे 10 ते 15 दिवसच काळजी घ्यावी लागणार आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार होलिकोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. 

कोरोना व्हायरसचे रुग्ण भारतात सापडल्याने खळबळ उडाली आहे. दिल्लीमध्ये तपासणीसाठी रांगा लागल्या आहेत. तर एका संक्रमित रुग्णाच्या बाजुला बसून विमान प्रवास करणाऱ्या नागपूरच्या प्रवाशाला आरोग्य यंत्रणेने देखरेखीखाली ठेवले आहे. यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. राज्यात होळीचा सण साजरा केला जाणार आहे. सण साजरा करा पण मोठ्या प्रमाणावर नको, असे आवाहन ठाकरे यांनी केले आहे. 

तसेच केवळ 10 ते 15 दिवस आपल्या सर्वांना काळजी घ्यायची असून मास्क लावण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले आहेत. त्यांच्यासोबत आलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्य़ांनी कोरोनाबाबत काय काळजी घ्यावी, याचे मार्गदर्शन केले. तसेच वृत्त देताना खबरदारी घ्यावी असे आवाहनही माध्यमांना केले. सॅनिटायझरने हात धुण्याची गरज नाही. नळाच्या वाहत्या पाण्यामध्येही हात धुतले तरीही चालणार असल्याचे ते म्हणाले. तसेच मुंबई आणि पनवेलमध्ये असे दोन रुग्ण संशयित आढळले होते. त्यांना तपासणीनंतर सोडून देण्यात आल्याचेही आरोग्य अधिकारी म्हणाले. यानंतर नागपूरच्या प्रवाशाला कोरोनाची लागण झालेली नसून त्याला निरिक्षणाखाली ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र