शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

coronavirus: ठाणे, केडीएमसीत पुन्हा कडक लॉकडाऊन! मीरा-भाईंदर, पुण्यातही घातले निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 06:16 IST

ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि मीरा-भाईंदर महानगरपालिकांच्या क्षेत्रात पुन्हा १२ ते १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे.

ठाणे/पुणे : गेल्या काही दिवसांत वाढलेली कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी १२ जुलैपासून ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि मीरा-भा^र्इंदरमध्ये महानगरपालिकांच्या क्षेत्रात तर सोमवार (दि.१३) मध्यरात्रीपासून पुणे शहरासह पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. औरंगाबाद शहरात १० जुलैपासूनच लॉकडाऊन वाढवण्यात आला असून त्याची कडक अंमलबजावणी सुरू आहे.ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि मीरा-भाईंदर महानगरपालिकांच्या क्षेत्रात पुन्हा १२ ते १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा तसेच किराणा, भाजीपाला आणि वैद्यकीय सेवा यातून वगळण्यात आल्या आहेत. ठाणे शहरात सध्या ३९२ कंटेनमेंट झोन असून रुग्णांची संख्या गुणाकार पद्धतीने वाढली आहे.पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर, हवेली तालुक्यासह जिल्ह्यातील पाचपेक्षा अधिक रुग्ण असलेल्या गावांमध्ये पुढील दहा दिवस म्हणजे २३ जुलैपर्यंत अत्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये पहिल्या पाच दिवसांत म्हणजे १८ जुलै पर्यंत नागरिकांना केवळ दूध मिळणार असून, भाजीपाल्यासह किराणा मालाची दुकाने बंद राहणार आहेत. उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या आढावा बैठकीनंतर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्यासह जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत दिली.राज्यात ७,८६२ रुग्ण वाढलेमुंबई : राज्यात दिवसभरात तब्बल ७८६२ नवीन कोरोना रूग्णांची नोंद झाली तर २२६ जणांचा मृत्यू झाला. बाधितांची संख्या आठ हजारांच्या जवळ गेली असली तरी बरे होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. शुक्रवारी ५३६६ रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत १,३२,६२५ रुग्ण बरे झाले.देशात २६,५०६ नवे रुग्णदेशात गेल्या २४ तासात कोरोना रुग्णांची संख्या २६ हजार ५०६ ने वाढल्याने एकूण रुग्णसंख्या ७ लाख ९३ हजार ८०२ इतकी झाली आहे. एका दिवसात ४७५ मृत्यू झाल्याने एकूण बळींचा आकडा २१ हजार ६०४ वर पोहचला आहे. या आजारातून ४ लाख ९५ हजार ५१२ रुग्ण बरे होऊन घरी घेले आहेत. देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६२.४२ टक्के इतके आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकPuneपुणे