शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

Coronavirus : आरोग्यमंत्र्यांनी सांगितली दिलासादायक गोष्ट; कोरोनाला हरवण्याचा दिला 'मंत्र'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 4:42 PM

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीसुद्धा फेसबुक लाइव्ह करत राज्यातील सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली आहे.

मुंबईः जगभरात वाऱ्यासारख्या पसरलेल्या कोरोनानं भारतातही धुमाकूळ घातला आहे. भारतातली अनेक राज्यं कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे. त्यानंतर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून, रेल्वे, बससेवा बंद केली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीसुद्धा फेसबुक लाइव्ह करत राज्यातील सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली आहे. मी घरी थांबणार, मी कोरोना हरवणार, असं आरोग्य मंत्र्यांनी आवाहनही केलं आहे.औषध उपलब्धता, वैद्यकीय साठा, खाटांचा रिव्ह्यू घेण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाग्रस्तांना 1000 रुग्णालये सेवा देणार आहेत. जिल्हा पातळीवरची यंत्रणाही मोठ्या प्रमाणात सक्रिय होणार आहे. कोरोनाचे रुग्ण बरे होताहेत हे बाब समाधानकारक असल्याचंही आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी सांगितलं आहे. कोरोनाचे दोन रुग्ण अतिदक्षता कक्षात असून, इतरांची प्रकृती स्थिर असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. माणुसकीने वागा, सतर्कता बाळगा, सुरक्षित राहा, अन्य जिल्ह्यातील नागरिकांकडे संशयाने पाहू नका, धार्मिक स्थळांमध्ये गर्दी टाळा आणि गावातील परिजनांना घरी येऊ द्या, त्या आळा घालू नका, असंही राजेश टोपे म्हणाले आहेत.खासगी डॉक्टरांनी बाह्यरुग्ण विभाग बंद केलं असून, वैद्यकीय सेवा अत्यावश्यक आहेत, त्या सेवा देण्यात येणार आहेत. वैद्यकीय सेवेवर निर्बंध नाहीत, त्यामुळे सामान्यांना सेवा द्यावी लागणार आहे. कोरोना बरा होऊ शकतो, 106 रुग्णांपैकी केवळ दोघांची स्थिती गंभीर असून, 15 जणांना डिस्चार्ज मिळू शकतो. पुणे, मुंबईतील नागरिकांकडे संशयाने बघू नका, असं आवाहनही टोपेंनी केलं आहे. 

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपे