शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

CoronaVirus News: हॉटेल, रेस्टॉरंट, बार ५ ऑक्टोबरपासून सुरू; अनलॉक-५ ची नियमावली जाहीर

By कुणाल गवाणकर | Published: September 30, 2020 7:47 PM

CoronaVirus News: लोकलची संख्या वाढवणार; डबेवाल्यांनी लोकल प्रवास करण्याची परवानगी

मुंबई: राज्य सरकारनं अनलॉक-५ संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार ५ ऑक्टोबरपासून हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेनंच सुरू ठेवावी लागतील. गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय फेस मास्क, सॅनिटायझरचा वापर बंधनकारक असेल. सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेण्याच्या सूचनादेखील राज्य सरकारकडून करण्यात आल्या आहेत. अनलॉक-४ ची मुदत संपत आल्यानं अनलॉक-५ च्या मार्गदर्शक सूचना नेमक्या कधी जाहीर करण्यात येणार याकडे लक्ष लागलं होतं. अखेर ठाकरे सरकारनं अनलॉक-५ च्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या. हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरू करू देण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून जोर धरू लागली होती. अखेर हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास राज्य सरकारनं परवानगी दिली आहे. ५ ऑक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेनं हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरू होतील.पुणे विभागातील ट्रेन सुरू करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला आहे. याशिवाय राज्यातल्या राज्यात धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यादेखील सुरू करण्यात येणार आहेत. सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कामगारवर्ग लोकलनं प्रवास करू शकतो आहे. मात्र तरीही लोकलमध्ये गर्दी होत आहे. त्यामुळे लोकलची संख्या वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. लोकलमधून प्रवास करू देण्याची विनंती डबेवाल्यांनी केली होती. ती सरकारनं मान्य केली आहे. त्यासाठी डबेवाल्यांना क्यूआर कोड देण्यात येईल.मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये (एमएमएमआर) केवळ अत्यावश्यक वस्तूंचं उत्पादन करण्यास परवानगी होती. मात्र अनलॉक-५ मध्ये हे निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त असल्यानं कारखाने आणि कार्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय आधी सरकारनं घेतला होता.मुंबईतील सिंगल स्क्रीन आणि मल्टिप्लेक्सदेखील लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात उद्या एक महत्त्वाची बैठक होणार आहे. सोशल डिस्टन्सिंगसह इतर नियम पाळून चित्रपटगृहं सुरू करण्याबद्दल या बैठकीत चर्चा होईल. त्यामुळे उद्या याबद्दल सकारात्मक निर्णय होऊ शकतो.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या