शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : आंतरराष्ट्रीय प्रवास करून राज्यात येताना आरटीपीसीआर चाचणी बांधनकारक, राज्य सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 00:31 IST

आज गेल्या 24 तासांत राज्यात ४ हजार ६५४ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत १७० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मुंबई - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवास करून राज्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने वेळो वेळी जारी केलेले आदेश आजपासून लागू होत आहेत. तसे पत्रकही राज्य शासनाने काढले आहे. यानुसार, आता केंद्र सरकारच्या नियमांप्रमाणे आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या व्यक्तीने लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरी, त्याला कोरोनाची आरटीपीसीआर(RT PCR) टेस्ट करणे बंधनकारक आहे. हाच नियम आता राज्यातही लागू राहील. (CoronaVirus: RT PCR test mandatory for international travellers, Maharashtra govt decides) 

आज राज्यात समोर आले ४,६५४ नवे कोरोना रुग्ण -आलेल्या आकडेवारीनुसार, आज गेल्या 24 तासांत राज्यात ४ हजार ६५४ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत १७० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ३ हजार ३०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ५२ हजार १५० रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण ५१ हजार ५७४ इतकी आहे. 

आज झालं तब्बल 93 लाख नागरिकांचं लसीकरणदेशात शुक्रवारी कोरोना लसीकरणाचा नवा विक्रम नोंदवला गेला. सरकारने सांगितल्यानुसार, आज भारतात 93 लाखांहून अधिक लोकांना लस टोचण्यात आली. लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून एका दिवसात करण्यात आलेले हे सर्वाधिक लसीकरण आहे. दरम्यान, देशातील एकून लसीकरणाचा आकडा 62 कोटींच्या पुढे गेला आहे. आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सोशल मिडियावर ही माहिती दिली.

काल केरल (31,645), महाराष्ट्र (5,131), आंध्र प्रदेश- (1,622), तमिळनाडू- (1,604) आणि कर्नाटक- (1,224) या पाच राज्यांत सर्वाधिक नवे कोरोना रुग्ण आढळले होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्र