CoronaVirus News: दिलासा! राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० टक्के
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 06:52 IST2020-10-06T03:15:36+5:302020-10-06T06:52:45+5:30
CoronaVirus News: ११.६२ लाख कोविडमुक्त; दिवसभरात १०,२४४ नवे रुग्ण

CoronaVirus News: दिलासा! राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० टक्के
मुंबई : राज्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात १२ हजार ९८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत ११ लाख ६२ हजार ५८५ रुग्ण कोविडमुक्त झाले. दिवसभरात १० हजार २४४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून २६३ मृत्यूंची नोंद झाली.
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० टक्क्यांवर पोहोचले असून मृत्युदर २.६४ टक्के आहे. सध्या २ लाख ५२ हजार २७७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या १४ लाख ५३ हजार ६५३ वर पोहोचली असून बळींचा आकडा ३८ हजार ३४७ झाला आहे. सध्या २२ लाख १६० व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून २६ हजार ७४९ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७१ हजार ६९ हजार ८८७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०.२७ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.