शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

coronavirus : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या अडीच हजारांवर, आज दिवसभरात ३५० रुग्णांचे निदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 21:01 IST

राज्य शासनासमोर संसर्ग संक्रमण रोखण्याचे आव्हान गडद होते आहे. राज्यात मंगळवारी ३५० रुग्णांचे निदान झाले, यात सर्वाधिक रुग्ण २०४ मुंबईतील आहेत.

ठळक मुद्देराज्याची रुग्णसंख्या २ हजार ६८४ वरआज राज्यात १८ मृत्यूंची नोंद झाली, त्यातील ११ मुंबईत असून राज्याचा मृतांचा आकडा १७८ वरराज्यात आजपर्यंत २५९  करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत

मुंबई – राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा अडीच हजारांहून अधिक झाला आहे. त्यामुळे राज्य शासनासमोर संसर्ग संक्रमण रोखण्याचे आव्हान गडद होते आहे. राज्यात मंगळवारी ३५० रुग्णांचे निदान झाले, यात सर्वाधिक रुग्ण २०४ मुंबईतील आहेत. यामुळे राज्याची रुग्णसंख्या २ हजार ६८४ वर पोहोचली आहे. तर मंगळवारी राज्यात १८ मृत्यूंची नोंद झाली, त्यातील ११ मुंबईत असून राज्याचा मृतांचा आकडा १७८ वर पोहोचला आहे. याखेरीज दिलासादायक म्हणजे राज्यात आजपर्यंत २५९  करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्यात मंगळवारी झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे ११, पुण्यातील ४ तर अहमदनगर आणि औरंगाबाद मनपा येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. एक मृत्यू राज्याबाहेरील नागरिकाचा आहे. यात  ११ पुरुष तर ७ महिला आहेत. आज झालेल्या १८ मृत्यूपैकी ५ जण हे ६० वर्षांवरील आहेत ११ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत.  तर दोघेजण ४० वर्षाखालील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या १८ जणांपैकी १३ रुग्णांमध्ये ७२ टक्के मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. या रुग्णांपैकी एकाला कर्करोग तर एकाला क्षयरोग होता. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १७८ झाली आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४६,५८८ नमुन्यांपैकी ४२,८०८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. राज्यात आजमितीस एकूण ५०५९ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी १८.३७ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.  सध्या राज्यात ६७,७०१ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ५,६४७  लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

सहा महिन्यांच्या बाळाने जिंकली लढाई

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सायंकाळी जनतेला संबोधताना सहा महिन्यांच्या बाळाने कोरोनाविरोधातील लढाई जिंकल्याची माहिती दिली. या लहानग्या बाळाशी मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरुन संवाद साधत आपुलकीने चौकशी केल्याचेही त्यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे, एका ८३ वर्षीय ज्येष्ठ महिलेने कोरोनावर मात केल्याचा उल्लेख त्यांनी भाषणात केला. त्यामुळे कोरोनाविरोधातील युद्ध जिंकणे शक्य आहे. सामान्यांनी घाबरुन न जाता शासनाला सहकार्य करा आपण ही लढाई नक्की जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई