coronavirus: राज्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या साडेचार लाखाच्या उंबरठ्यावर, पण नव्या बाधितांमध्येही प्रचंड वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 08:50 PM2020-08-19T20:50:41+5:302020-08-19T20:56:13+5:30

राज्यात आज ९०११ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर तब्बल १३ हजार १६५ नव्या रुग्णांचे निदान झाले

coronavirus: The number of coronavirus-free patients in Maharashtra is close to 4.5 lakh, but there is a huge increase in new cases. | coronavirus: राज्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या साडेचार लाखाच्या उंबरठ्यावर, पण नव्या बाधितांमध्येही प्रचंड वाढ

coronavirus: राज्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या साडेचार लाखाच्या उंबरठ्यावर, पण नव्या बाधितांमध्येही प्रचंड वाढ

Next

 मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण वेगाने वाढत असले तरी नव्या रुग्णांची वाढती संख्याही शासन आणि प्रशासनाची चिंता वाढवत आहे.  राज्यात आज ९०११ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.०९ टक्क्यांवर पोहोचले आहे. मात्र त्याच वेळी आज राज्यात आज तब्बल १३ हजार १६५ नव्या रुग्णांचे निदान झाले असून, राज्यातील एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ६० हजार ४१३ वर पोहोचली आहे.  दरम्यान दिवसभरात राज्यात ३४६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

 राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ४६ हजार ८८१ रुग्ण बरे झाले आहेत. तर आज ९०११ रुग्णांनी कोरोनावर मात केली.  राज्यातून आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३३ लाख ३७ हजार ८४८ नमुन्यांपैकी ६ लाख २८ हजार ६४२ नमुने पॉझिटिव्ह (१८.८३ टक्के) आले आहेत. राज्यात ११ लाख ६२ हजार ४५० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ०९४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३४६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३५ टक्के एवढा आहे. 

आज निदान झालेले १३,१६५ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ३४६ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-११३२ (४६), ठाणे- २३७ (५), ठाणे मनपा-२४१ (९), नवी मुंबई मनपा-३५२ (८), कल्याण डोंबिवली मनपा-३८६ (१२), उल्हासनगर मनपा-२० (३), भिवंडी निजामपूर मनपा-२६ (२), मीरा भाईंदर मनपा-१४० (३), पालघर-२३७(८), वसई-विरार मनपा-१८२ (६), रायगड-२७० (४), पनवेल मनपा-२२७ (३), नाशिक-२३१ (२), नाशिक मनपा-५२० (३), मालेगाव मनपा-२५ (१), अहमदनगर-२९६ (७),अहमदनगर मनपा-३०७ (६), धुळे-३० (२), धुळे मनपा-५८ (१), जळगाव-४९६ (८), जळगाव मनपा-१०९ (१), नंदूरबार-३८, पुणे- ६६० (२१), पुणे मनपा-१२३३ (३८), पिंपरी चिंचवड मनपा-७९५ (२७), सोलापूर-३९९ (१५), सोलापूर मनपा-६७ ,सातारा-२८६ (९), कोल्हापूर-३८७ (१३), कोल्हापूर मनपा-१४७ (२), सांगली-९६ (६), सांगली मिरज कुपवाड मनपा-२२३ (१२), सिंधुदूर्ग-१४ (२), रत्नागिरी-४३ , औरंगाबाद-१७८ (१),औरंगाबाद मनपा-३६८, जालना-१५०, हिंगोली-३५(१), परभणी-४८, परभणी मनपा-५६ (३), लातूर-५० (१), लातूर मनपा-८१(२), उस्मानाबाद-३०६ (६), बीड-२६३ (२), नांदेड-१०३ , नांदेड मनपा-८३, अकोला-४५ (१), अकोला मनपा-१५ (१), अमरावती-३०, अमरावती मनपा-८१, यवतमाळ-५८ (१०), बुलढाणा-७२, वाशिम-१३ , नागपूर-१८० (३), नागपूर मनपा-८१७ (२३), वर्धा-५९ (१), भंडारा-४३ (४), गोंदिया-३४ (१), चंद्रपूर-६१, चंद्रपूर मनपा-४, गडचिरोली-१३, इतर राज्य ९ (१).

 

Web Title: coronavirus: The number of coronavirus-free patients in Maharashtra is close to 4.5 lakh, but there is a huge increase in new cases.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.