शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : ...यापुढे लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नकोत - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 07:37 IST

Uddhav Thackeray : ‘साप भी मरे और लाठी भी ना तुटे’ असे आपल्याला वागावे लागेल. यापुढे लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नकोत, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी मांडली.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी रविवारी राज्यातील प्रमुख उद्योजकांसोबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला.

मुंबई : कामगारांच्या आरोग्याची काळजी घेऊन उद्योग सुरू करावेत. अद्याप कोरोनाचे संकट टळलेले नाही. अनलॉक करताना आपण कॅलक्युलेटेड रिस्क घेत आहोत, त्यामुळे काळजी घ्या. एकदम काहीही शिथिल केलेले नाही. त्यासाठी काही निकष आणि पातळ्या ठरविल्या आहेत. निर्बंध किती शिथिल करायचे किंवा कडक करायचे याचा निर्णय स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन घेईल. ‘साप भी मरे और लाठी भी ना तुटे’ असे आपल्याला वागावे लागेल. यापुढे लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नकोत, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी मांडली.

मुख्यमंत्र्यांनी रविवारी राज्यातील प्रमुख उद्योजकांसोबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. कोरोना काळातही संपूर्ण काळजी घेऊन महाराष्ट्राने उद्योग चालवून दाखविले, असे उदाहरण मला देशात निर्माण करायचे असल्याचे सांगतानाच आपल्याला लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नकोत, असे मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले. युकेतील विषाणूसारखे किंवा त्यापेक्षाही जास्त धोकादायक पद्धतीने आपल्याकडे संसर्ग वाढला आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी लॉकडाऊन करावे लागले, अन्यथा कोरोनाने आपल्याला नॉकडाऊन केले असते, अशा मोजक्या शब्दात मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या गांभीर्याबद्दल सांगितले.

आता आपल्याला लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नको आहेत. यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, कामगारांचे लसीकरण करून घेणे, पाळ्यांमध्ये काम करणे, वर्क फ्राॅम होमला प्रोत्साहन देणे या गोष्टी कराव्या लागणार आहेत. याशिवाय ज्या लोकांना कामावर येणे आवश्यक आहे त्यांच्यासाठी ‘बायो-बबल’ तयार करावा. यात आवश्यक कामगारांना कामाच्याच ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी. ज्याप्रमाणे आरोग्यासाठी फिल्ड सुविधा उभारल्या तसे उद्योगांनी त्यांच्या भागात कामगार व कर्मचाऱ्यांसाठी तात्पुरत्या निवास सुविधा उभाराव्यात तसेच वैद्यकीय व इतर आवश्यक सुविधांचे नियोजन करून ठेवावे. यासाठी शासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

ऑक्सिजन आणताना उद्योजकांचे साहाय्यराज्यात १२०० मेट्रिक टन ऑक्सिजननिर्मिती होते. यातील काही उद्योगक्षेत्रांसाठी वापरले जाते. उद्योग क्षेत्राने सहकार्य केल्यामुळे हे सर्व ऑक्सिजन रुग्णांसाठी वापरता आले. याशिवाय बाहेरील राज्यातून ५०० मेट्रिक टन ऑक्सिजन आणण्यासाठीही उद्योजकांनी मदत केल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. सध्या राज्यात तीन हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागू शकेल, असा अंदाज आहे. ही पूर्तता मिशन ऑक्सिजनअंतर्गत पूर्ण करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

बाहेरील कामगारांची नोंद ठेवाबाहेर राज्यातून येणाऱ्या कामगारांची नोंद ठेवण्यात यावी, तसेच बाहेर राज्यातून आल्यानंतर सात दिवस अलगीकरणात ठेवून त्यांची योग्य तपासणी झाल्यानंतरच त्यांना कामावर घ्यावे, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.उद्योजकांसाठी सुविधा उपलब्ध करून देणार - उद्योगमंत्री सुभाष देसाईलाॅकडाऊनमुळे उत्पादनावर परिणाम होऊ नये यासाठी लघु व मध्यम उद्योगांसाठी एमआयडीसीच्या माध्यमातून सुविधा देण्यात येतील. मोठे उद्योग समूह आपल्या कामगारांसाठी उपाहारगृहाची सोय देऊ शकतात. मात्र, छोट्या उद्योजकांना ते शक्य नसते. अशांसाठी एमआयडीसीच्या माध्यमातून ५३ उपाहारगृहे चालविण्यात येणार आहेत. याशिवाय सार्वजनिक सुविधा केंद्र उभारणीसाठी शासनातर्फे जमीन उपलब्ध करून देण्यात येईल. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस