मुंबई : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना नांदेडहून पुढील उपचारासाठी मुंबईतल्या ब्रिच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कोरोनाशी मुकाबला करत असतानाही अशोक चव्हाण सोशल मीडियाच्या माध्यमातून ऍक्टिव्ह आहेत. अशोक चव्हाणांनी रुग्णालयातूनच एक व्हिडीओ शेअर केला असून, काँग्रेसच्या मोहिमेत सक्रिय सहभाग घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.व्हिडीओत ते म्हणाले, मित्र हो नमस्कार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी वढेरा यांनी जी स्पीक अप इंडियाची मोहीम हाती घेतलेली आहे. त्यात मी सहभाग नोंदवत आहे. कोट्यवधी देशवासीयांचे जे मनोगत आहे. त्यांचा आवाज बुलंद करण्याच्या दृष्टिकोनातून आज मी मुंबईतल्या एका हॉस्पिटलमधून कोरोनाशी लढा देत असताना स्पीक अप इंडिया या मोहिमेमध्ये सहभागी होत असल्याचं जाहीर करतोय.
CoronaVirus News: ...अन् फडणवीस पुन्हा आले; ठाकरे सरकारच्या 'त्या' दाव्यांची चिरफाड करून गेले
CoronaVirus News: विरोधकांकडून सरकारला बदनाम करायचं काम; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
CoronaVirus News :मोदींच्या भारताकडे कोणी डोळे वटारून पाहू शकत नाही, भाजपाचा राहुल गांधींवर निशाणा
भारत-चीन तणाव वाढला! युद्धाच्या तयारीला वेग द्या; शी जिनपिंग यांचे सेनेला आदेश