शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: मुंबईतील आणखी चौघा पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 17:37 IST

CoronaVirus News: कोविड-19च्या संसर्गामुळे आतापर्यंत मुंबई पोलिसांतील 23 तर राज्यभरातील 37 पोलिसांचा बळी गेला आहे. 

मुंबई -राज्याप्रमाणे  मुंबई पोलीस दलातही कोरोनाचे थैमान सुरूच असून, गेल्या 24 तासांत मुंबईतील चौघा पोलिसांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर  विविध रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र मृत्यूबरोबरची त्यांची झुंज अपयशी ठरली. चोघे अंमलदार अनुक्रमे दिंडोशी, बोरिवली, वाकोला पोलीस ठाणे आणि संरक्षण विभागात ते कार्यरत होते. अल्पावधीत मृत्यूचे प्रमाण वाढल्याने पोलीस वर्तुळ आणि त्याच्या कुटुंबीयांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे आतापर्यंत मुंबई पोलिसांतील 26तर राज्यभरातील 40 पोलिसांचा बळी गेला आहे. दिंडोशी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराला कोरोनाची लागण झाल्याचे चार जूनला स्पष्ट झाले. तेव्हापासून त्यांच्यावर सेव्हन हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आठवडाभर त्याची प्रकृती स्थिर होती. शुक्रवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास त्याचे निधन झाले.  बोरिवली पोलीस ठाण्यात नियुक्तीला झालेल्या 42 वर्षांच्या पोलीस हवालदाराला बंदोबस्ताच्या ड्युटीवेळी कोरोनाबाधिताशी संपर्क झाल्याने लागण होऊन पॉझिटिव्ह अहवाल आला होता. त्याच्यावर नालासोपारा येथील स्टार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्याचे रात्री निधन झाले. वाकोला पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिसावर परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याचे शनिवारी निधन झाले. तर संरक्षण विभागात कार्यरत असलेल्या एका अंमलदारावर आठवड्याभरापासून उपचार सुरू होते. राज्य पोलीस दलात आतापर्यंत 197अधिकारी व 1211 अंमलदार असे एकूण 1408 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक अधिकारी व अंमलदार हे मुंबई पोलीस दलातील आहेत. कोरोनाबाधित पोलिसांचे बरे होण्याचे प्रमाण वाढत असले तरी मृत्यू झालेल्याची संख्या वाढत आहे. त्यामुळे पोलीस दलात या विषाणूबद्दलची भीती कायम राहिली आहे.

हेही वाचा

'या' कठीण काळात भगवद्गीतेमध्ये शोधा शक्ती अन् शांती : तुलसी गबार्ड

CoronaVirus News: लष्करातही कोरोनाचा शिरकाव; काश्मीरमध्ये CRPFचे 31 जवान संक्रमित

CoronaVirus : धोका वाढला! चीनमध्ये कोरोनाची 'दुसरी' लाट; बीजिंगमध्ये लॉकडाऊन

CoronaVirus News: दिल्लीत कोरोनानं हाहाकार; स्मशानात मृतदेहांसाठी जागाच नाही

टॅग्स :Policeपोलिस