शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

CoronaVirus News : राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५ हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2020 21:29 IST

CoronaVirus News : राज्यात ५ लाख २८ हजार ४६२ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ७ हजार ११८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

ठळक मुद्देराज्यात गेल्या २४ तासांमध्ये ७५ मृत्यूंची नोंद झाली आहे.

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत आज थोडीशी घट दिसून येत आहे.  दिवसभरात राज्यात ५ हजार ९६५  नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १८ लाख १४ हजार ५१५ इतकी झाली आहे. तर राज्यात गेल्या २४ तासांमध्ये ७५ मृत्यूंची नोंद झाली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात आज ५ हजार ९६५ नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर, आज दिवसभरात राज्यभरात ३ हजार ९३७ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यात आतापर्यंत एकूण १६ लाख ७६ हजार ५६४ करोना बाधित रुग्णांनी या आजारावर मात करण्यात यश मिळवले आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) सध्या ९२.४ % इतके झाले आहे. 

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ७ लाख २२ हजार १९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख १४ हजार ५१५ (१६.९२ टक्के ) नमुने करोनासाठी पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या प्रत्यक्षात ८९ हजार ९०५ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर रुग्णालयांत उपचार सुरू आहे. राज्यात ५ लाख २८ हजार ४६२ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ७ हजार ११८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यातील लॉकडाऊन ३१ डिसेंबरपर्यंत वाढवलाकोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील लॉकडाऊन ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आला आहे.  शुक्रवारी यासंदर्भातील आदेश राज्यातील ठाकरे सरकारने काढला आहे. राज्यातील कंन्टेन्मेंट झोनमध्ये म्हणजेच कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात हा लॉकडाऊन असणार आहे. 

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ७५८ रुग्णे सापडलेजिल्ह्यात कोरोनाचे ७५८ रुग्ण शनिवारी सापडले असून नऊ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. जिल्ह्यात आता दोन लाख २७ हजार ७९९ रुग्ण संख्या झाली असून पाच हजार ६६९ मृत्यूची नोंद झालेली आहे.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्र