CoronaVirus News: राज्यात ओमायक्रॉनबाधित सतराशे पार; पैकी ८७९ जणांना डिस्चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 06:10 AM2022-01-16T06:10:58+5:302022-01-16T06:11:26+5:30

आतापर्यंत राज्यात एकूण १७३० ओमायक्रॉन विषाणूबाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी ८७९ रुग्णांना  त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

CoronaVirus News Maharashtra Reports 42462 New Infections omicron cases crosses 1700 mark | CoronaVirus News: राज्यात ओमायक्रॉनबाधित सतराशे पार; पैकी ८७९ जणांना डिस्चार्ज

CoronaVirus News: राज्यात ओमायक्रॉनबाधित सतराशे पार; पैकी ८७९ जणांना डिस्चार्ज

Next

मुंबई : राज्यात शनिवारी १२५ ओमायक्रॉनबाधित रुग्ण सापडले आहेत. या सर्व रुग्णांचे निदान राष्ट्रीय विषाणू संस्थांनी केले आहे. आतापर्यंत राज्यात एकूण १७३० ओमायक्रॉन विषाणूबाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी ८७९ रुग्णांना  त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील, तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे  आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.

७२ नमुन्यांचा अद्याप प्रलंबित 
आतापर्यंत ४७९२ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ७२ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

नागपूर-    ३९, 
मुंबई-     २४, 
मीरा-भाईंदर-     २०, 
पुणे मनपा –     ११, 
अमरावती-    ९, 
अकोला-    ५, 
पिंपरी-चिंचवड    ३    
औरंगाबाद, जालना, पुणे ग्रामीण आणि अहमदनगर –  
प्रत्येकी २    
नाशिक, कोल्हापूर, लातूर, सातारा, ठाणे मनपा आणि वर्धा- प्रत्येकी १  रुग्ण

Web Title: CoronaVirus News Maharashtra Reports 42462 New Infections omicron cases crosses 1700 mark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.