शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

CoronaVirus News: दिलासा; राज्यात शनिवारी ३१ हजार ९६४ रुग्ण कोरोनामुक्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 06:31 IST

CoronaVirus News: नवीन २०,२९५ बाधितांचे निदान; ४४३ मृत्यू

मुंबई : राज्यात शनिवारी दिवसभरात ३१,९६४ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण ५३,३९,८३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.४६ टक्के एवढे झाले आहे.राज्यात शनिवारी २०,२९५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ४४३ मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्युदर १.६५% एवढा आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५७,१३,२१५ झाली असून एकूण मृत्यू ९४ हजार ३० आहेत. सध्या २ लाख ७६ हजार ५७३ रुग्ण उपचाराधीन आहेत.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,४६,०८,९८५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.५१ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २०,५३,३२९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर १४,९८१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. दिवसभरात नोंद झालेल्या एकूण ४४३ मृत्यूंपैकी २८८ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर १५५ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत.मुंबईत एक हजार ४८ रुग्णमुंबई : मुंबईत कोरोनाचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. मुंबईतील कोरोनाचा दुपटीचा दर वाढला असून तो चारशेच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत एक हजार ४८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, २५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे; तर एक हजार ३५९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या सात लाख ४ हजार ५०९ वर पोहोचली आहे. यांपैकी आतापर्यंत १४ हजार ८३३ जणांचा मृत्यू झाला असून, ६ लाख ५९ हजार ८९९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत २७ हजार ६१७ जणांवर उपचार सुरू आहेत. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर ९४ टक्के झाला असून, २२ मे ते २८ मे २०२१ पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.१७ टक्के झाला आहे. तसेच मुंबईतील दुपटीचा दर ३९९ दिवसांवर गेला आहे. मुंबईतील मृत्युदर २.३ टक्के झाला आहे.  मुंबईत शनिवारी २६ हजार ७५१ कोरोना चाचण्या झाल्या असून शनिवारपर्यंत ६२ लाख २९ हजार ३३० चाचण्या झाल्या आहेत. दिवसभरात मृत्यू झालेल्या २५ रुग्णांपैकी १५ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. यामध्ये १५ रुग्ण पुरुष आणि १० रुग्ण महिला होत्या. ३ रुग्णांचे वय ४० वर्षांखाली होते; तर १३ रुग्णांचे वय ६० वर्षांवर होते आणि उर्वरित नऊ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.  

राज्यात २ कोटी १९ लाख लाभार्थ्यांना लसमुंबई : राज्यात शुक्रवारी २ लाख ६९ हजार २६३ लाभार्थ्यांना लस देण्यात आली, तर आतापर्यंत एकूण २ कोटी १९ लाख १३ हजार ८३७ जणांचे लसीकरण करण्यात आले.राज्यात १९ लाख १ हजार ७५१ आरोग्य कर्मचाऱ्यांना, तर २५ लाख ३ हजार ९९३ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्या खालोखाल १८ ते ४४ वयोगटातील ८ लाख ८५ हजार ३१३ लाभार्थ्यांचे, तर ४५हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ६६ लाख २२ हजार ७७२ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.

मुंबईत आतापर्यंत एकूण ३२ लाख १४ हजार ५८५, पुण्यात २७ लाख ६० हजार ३५८, ठाण्यात १६ लाख ६३ हजार २३१, तर नागपूरमध्ये १२ लाख ७५ हजार ६६३ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस