शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News in Maharashtra : कोरोना रुग्णसंख्येत किंचित घट, तरीही चिंता कायम; दिवसभरात 47 हजार 288 नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 22:20 IST

CoronaVirus News in Maharashtra : आजची आकडेवारी थोडीशी कमी असली तरीही राज्याची चिंता अद्याप कायम आहे.

ठळक मुद्देसोमवारी राज्यात दिवसभरात 47 हजार 288 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात 26 हजार 252 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबई : राज्यात आज कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 47 हजार 288 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर 26 हजार 252 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 155 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजची आकडेवारी थोडीशी कमी असली तरीही राज्याची चिंता अद्याप कायम आहे. काल राज्यात 57 हजार 074 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले होते. (Mahrashtra reports 47,288 new #COVID19 cases, 26,252 discharges and 155 deaths)

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी राज्यात दिवसभरात 47 हजार 288 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात 26 हजार 252 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.36 टक्के झाले आहे. तसेच, राज्यात सध्या 24 लाख 16 हजार 981 व्यक्ती होम क्वारंटाईन आहे. तर 20 हजार 115 वक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी 4 लाख 51 हजार 375 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

("25 वर्षांवरील सर्वांना लस द्या", मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे विनंती )

मुंबईतील रुग्णसंख्येत वाढ!मुंबईत आजही कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे मुंबईत 9 हजार 857 रुग्ण आढळले आहे. तर 3 हजार 357 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच, दिवसभरात 21 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर मुंबईत 74 हजार 522 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 81 टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 40 दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबईत 29 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत एकूण कोविड वाढीचा दर 1.70 टक्के झाला आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्र