शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: राज्यातील लॉकडाऊन वाढणार?; सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 12:25 IST

कोरोना संकटाला रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांची सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सगळ्या नेत्यांनी केलेल्या सूचना ऐकल्या. आता मे अखेरपर्यंत काळजी घेऊन आपल्याला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू द्यायचा नाही, अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले. आपण सगळे एकजुटीनं हे संकट दूर करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांशी काल मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. या बैठकीत सर्वच नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना काही सूचना केल्या. कोरोनाचा संकटाचा सामना करण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती यावेळी सरकारकडून देण्यात आली. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही, त्यांना पीककर्ज मिळावे म्हणून रिझव्‍‌र्ह बँकेशी बोलणे सुरू आहे. बियाणं व खरीप हंगाम व्यवस्थित मार्गी लावावा म्हणून चांगलं नियोजन केलं आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.मुंबई आणि राज्यातील आरोग्य परिस्थितीवर अधिक लक्ष देण्याची गरज असून रुग्णालय व्यवस्थापनात सुधारणा करण्याची गरज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. केंद्राकडे अधिकाधिक रेल्वे मागितल्या पाहिजेत. पोलिसांचं नैतिक बळ वाढवायला हवं. आपली अर्थव्यवस्था सुरू करताना क्षेत्रनिहाय तज्ज्ञांचे गट करावेत आणि गटनिहाय विविध उद्योग व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करावा. विरोधी पक्ष म्हणून आम्ही पूर्णपणे पाठीशी आहोत. आमच्याकडून राजकारण होणार नाही, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.परप्रांतीय मजूर पुन्हा राज्यात येतील. तेव्हा त्यांची स्थलांतरित कायद्यांतर्गत नोंद करण्यात यावी, अशी आग्रही मागणी राज ठाकरेंनी केली. परप्रांतीयांमुळे इथल्या सोयी सुविधांवर ताण येतो. त्यामुळे गोंधळ निर्माण होतो, हे आपण पाहिलं आहे. आता कोरोना संकटाच्या निमित्तानं परप्रांतीय मजूर राज्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे निर्माण झालेला गोंधळ दूर करण्याची हीच ती वेळ, असं राज ठाकरे म्हणाले. परप्रांतीय मजूर पुन्हा राज्यात येताना त्यांची नोंद व्हायला हवी, असं राज यांनी म्हटलं.पालघर रेड झोनमध्ये येतं. पण याठिकाणी आदिवासी भागही आहे. त्यांचे हाल सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी सकाळ, संध्याकाळ अशा रीतीने उपनगरी रेल्वेसेवा काही प्रमाणात तरी सुरू करावी, अशी मागणी बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केली. तर रिक्षा, हातगाड्या घेतलेल्यांचे कर्जाचे हप्ते थकले आहेत. ते पुनर्गठित करावेत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRaj Thackerayराज ठाकरे