शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

CoronaVirus News: कोरोना बळींच्या वारसांना पाच लाख; ताफ्यात नवीन बसेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 09:10 IST

एसटीच्या वर्धापनदिनी योजना जाहीर

यवतमाळ/मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी कर्मचारी आणि प्रवाशांसाठी विविध योजना व उपक्रम जाहीर करण्यात आले. यात कोरोना बळींच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपये देण्याच्या सरकारी योजनेला मुदतवाढ, लालपरीच्या ताफ्यात नवीन बसेस आदी घोषणांचा समावेश आहे.एसटीने मंगळवारी ७४व्या वर्षात पदार्पण केले. कोरोनाचे संकट पाहता यंदाही एसटीचा वर्धापनदिन ठिकठिकाणी साधेपणाने साजरा करण्यात आला. महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी विविध घोषणा केल्याची माहिती जनसंपर्क विभागाने दिली आहे.कोरोनामध्ये ज्यांचा मृत्यू झाला आहे, जे निकषात बसत असतील त्यांना महाराष्ट्र शासनाच्या नियमांप्रमाणे मदत दिली जाईल. मात्र, कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहेे; परंतु जे शासनाच्या निकषात बसत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य परिवहन महामंडळाच्या निकषाप्रमाणे पाच लाख रुपयांची मदत देण्याचे ॲड. परब यांनी जाहीर केले. महाकार्गोच्या चालकाला १५० रुपये भत्ताएसटीची ‘महाकार्गो’ ही मालवाहतूक सेवा उपयुक्त ठरू लागली आहे. मालवाहतूक करताना चालकांना पदरमोड करून आपला खर्च भागवावा लागतो. अशा चालकांना परगावी मुक्काम करावा लागल्यास सरसकट १५० रुपये प्रतिदिन भत्ता देण्यात येणार आहे.ताफ्यात लवकरच येणार नवीन बसेसप्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी राज्य शासनाने नवीन बसगाड्या घेण्यासाठी भरीव तरतूद केली आहे. जवळपास अडीच हजार गाड्या खरेदी करण्यात येतील. यामध्ये पर्यावरणपूरक अशा इलेक्ट्रिक बस, एलएनजी, सीएनजी, साध्या तसेच आरामदायी गाड्यांचा समावेश असेल.सोशल मीडियावर मिळणार माहितीराज्य परिवहन महामंडळाने उपलब्ध केलेल्या योजना, सेवा तसेच महामंडळाची विविध माहिती अधिकाधिक प्रवाशांपर्यंत पोहोचविण्यासाठी एसटीने स्वतःचे ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम व टेलिग्राम या समाजमाध्यमांवर अधिकृत खाते उघडले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटी