शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

CoronaVirus News : दिवसभरात २३४७ बाधित, तर ६०० रुग्ण कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 07:13 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : रविवारी २ हजार ३४७ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील बाधित रुग्णांची एकूण संख्या ३३ हजार ५३ झाली आहे. याशिवाय, रविवारी ६०० रुग्ण बरे होऊन घरी गेले.

मुंबई : रोजच्या कोरोनाबाधितांच्या संख्येत रविवारी तब्बल २ हजार ३४७ नवीन रुग्णांची भर पडली. चार दिवसांपासून साधारण पंधराशेच्या आसपास घुटमळणारी संख्या आज थेट दोन हजारांचा टप्पा पार करून पुढे गेली. त्यामुळे येत्या काळातही राज्याच्या महानगरी आणि शहरी भागांतील आकडे वाढतच राहणार का, अशी शंका निर्माण झाली आहे.रविवारी २ हजार ३४७ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील बाधित रुग्णांची एकूण संख्या ३३ हजार ५३ झाली आहे. याशिवाय, रविवारी ६०० रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७ हजार ६८८ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर, दिवसभरात ६३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यात ४४ पुरुष तर १९ महिलांचा समावेश आहे. आजच्या ६७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३४ रुग्ण आहेत तर २२ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. ७ जण ४० वर्षांखालील आहेत. या ६३ रुग्णांपैकी ४१ जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड-१९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूची संख्या आता ११९८ झाली आहे. रविवारी झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईमध्ये ३८, पुण्यात ९, औरंगाबाद शहरात ६, सोलापूर शहरामध्ये ३, रायगडमध्ये ३ आणि ठाणे जिल्ह्यात १, तर पनवेल शहरात १, लातूरमध्ये १, तसेच अमरावती शहरातील एकाचा समावेश आहे.प्रयोगशाळेत पाठविलेल्या २ लाख ७३ हजार २३९ नमुन्यांपैकी २ लाख ४० हजार १८६ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत, तर ३३ हजार ५३ जण पॉझिटिव्ह आले आहेत.मार्च महिन्यात प्रयोगशाळेत दररोज साधारण ६७९ नमुने पाठवले जायचे, तर मे महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात हीच संख्या दिवसाला ८ हजार ६२८ इतकी वाढली आहे. मार्च महिन्याच्या तुलनेत सुमारे १३ पट वाढ झाली आहे. सध्या देशात दर दहा लाख लोकांमागे १६३० प्रयोगशाळा चाचण्या होत असून महाराष्ट्रात हे प्रमाण २१३७ एवढे आहे.सध्या राज्यात ३ लाख ४८ हजार ५०८ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून १७ हजार ६३८ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृती योजना अमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १६८८ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १४,९७२ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६३.८३ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.राज्यात बरे झालेल्या एकूण रुग्णांच्या निम्मे रुग्ण या एका आठवड्यात बरे झाले आहेत. आज सर्वाधिक ६०० हून अधिक रुग्णांना घरी सोडण्यात आले. विशेष म्हणजे बरे होणारे सर्वाधिक रुग्ण हे मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव अशा कोरोना हॉटस्पॉट भागातील आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. साधारणत: मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून बरे झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडले जात आहे. मार्चमध्ये दोन अंकी असलेली ही संख्या एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून तीन अंकी झाली.

7,93,000 रुग्ण आशियातजगातील रुग्णांची संख्या ४७ लाख ५७ हजार झाली असून, त्यापैकी ७ लाख ९३ हजार रुग्ण आशियातील ४८ देशांत आहेत. आशियात सर्वाधिक म्हणजे १ लाख ४८ हजार रुग्ण तुर्कस्थानात असून, त्याखालोखाल इराण (१ लाख २० हजार), भारत (९४,८३५ ) आणि चीन (८२ हजार ) यांचा क्रमांक लागतो. जगात आतापर्यंत ३ लाख १३ हजार ९०० जण मृत्युमुखी पडले आहेत आणि १६ लाख ३१ हजार ७०० जण बरे झाले आहेत.4,987 नवे रुग्ण देशातदेशात गेल्या २४ तासांमध्ये ४,९८७ नवे रूग्ण आढळल्याने एकूण संख्या ९४,८३५ झाली आहे. मात्र २४ तासांत ३,९५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ३६ हजार २३६ असून, सध्या ५५ हजार ९४६ जणांवर उपचार सुरू आहेत. देशात कोरोनाने आतापर्यंत २९८० बळी गेले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्र