शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

CoronaVirus News : कोरोनाचा तरुणांना विळखा; बाधितांचा वयोगट बदलला!

By अतुल कुलकर्णी | Published: September 17, 2020 1:55 AM

३१ ते ४० वयोगटातील २१.३१ टक्के तरुण कोरोनाबाधित झाले आहेत. महाराष्टÑात एकूण १०,९७,८५६ रुग्णांपैकी एमएमआर रिजनमध्येच ४,१७,८३५ रुग्ण आहेत.

- अतुल कुलकर्णीमुंबई : ५० ते ६० वर्षे वयोगटाच्या लोकांना कोरोनाची लागण जास्त होते, असे सांगितले जात असले तरी ताज्या माहितीनुसार २१ ते ४० वयोगटातील तब्बल ३८.५५ टक्के तरुणांना कोरोनाची लागण झाली आहे.३१ ते ४० वयोगटातील २१.३१ टक्के तरुण कोरोनाबाधित झाले आहेत. महाराष्टÑात एकूण १०,९७,८५६ रुग्णांपैकी एमएमआर रिजनमध्येच ४,१७,८३५ रुग्ण आहेत. त्यामुळे जोपर्यंत एमएमआर रिजनमध्ये रुग्णसंख्या नियंत्रणात येत नाही तोपर्यंत मुंबईची लाइफलाइन लोकल ट्रेन सुरू होण्याची कोणतीही शक्यता नाही, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.१६ सप्टेंबरच्या सकाळी ११ वाजेपर्यंतची आकडेवारी पाहिली तर महाराष्टÑात एकूण रुग्णसंख्येपैकी सगळ्यात जास्त म्हणजे २,२९,४८४ रुग्ण हे ३१ ते ४० वयोगटातील आहेत. त्यामागे, मला काही होत नाही, असे तरुणांना सतत वाटत राहणे, त्यातून विनाकारण बाहेर फिरणे, मास्क न लावणे, सतत हात न धुणे, बाहेरचे पदार्थ काळजी न घेता खाणे ही त्यासाठीची प्रमुख कारणे आहेत, असे वैद्यकीय संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी लोकमतला सांगितले.- एका तपासणीसाठी आता १,२०० रुपये आकारले जात आहेत. एकूण तपासण्यांपैकी ११,५३,५८९ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत.देशात मृत्युदराच्या बाबतीत महाराष्टÑ तिसºया नंबरवर आहे. पंजाब (२.९८%), गुजरात (२.७९%) तर महाराष्टÑ (२.७७%) असा मृत्युदर आहे, असेही त्यांनी सांगितले.

- आपल्याकडे तपासण्यादेखील आता वाढवण्यात आल्या असून आतापर्यंत 55,12,807 रुग्णांच्या तपासण्या केल्या21,55,157 तपासण्या खासगी प्रयोगशाळेत करण्यात आल्या आहेत.- लक्षणे नसलेले, सौम्य लक्षणे असलेले, बरे होणारे रुग्ण २,६७,२९७ (२५%)- एकूण गंभीर रुग्ण ९५१२ (१%)- आयसीयूबाहेरील पण आॅक्सिजनवरील एकूण रुग्ण : १४,४४७ (१%)- बरे झालेले रुग्ण : ७,५५,८५० (७०%)- मृत्यू : २९,८९४ (३%)राज्यातील टॉप पाच विभागकोकण (मुंबई विभाग) ४,१७,८३५पश्चिम महाराष्टÑ (पुणे विभाग) ३,५४,११४खान्देश (नाशिक विभाग) १,४१,५९७विदर्भ (नागपूर/अमरावती विभाग) ९८,६७१मराठवाडा (८ जिल्हे) ७३,७७०कोणत्या वयोगटातील किती जणांना झाला कोरोना?वयोगट रुग्णसंख्या टक्केवारी० ते १० ४१,८०२ ३.८८११ ते २० ७५,७७५ ७.०४२१ ते ३० १,८५,५०८ १७.२३३१ ते ४० २,२९,४८४ २१.३२४१ ते ५० १,९१,९११ १७.८३५१ ते ६० १,७०,९१० १५.८७६१ ते ७० १,१२,३३५ १०.४३७१ ते ८० ५२,३७७ ४.८६८१ ते ९० १४,६८५ १.३६९१ ते १०० १८१९ ०.१७१०१ ते ११० ५ ०.००एकूण १०,७६,६११ १००%

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस