शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

CoronaVirus News: 'त्याला काय होतंय...' या वृत्तीनेच घात केला; सातारा, सांगली, कोल्हापुरात कोरोना वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 10:11 IST

सातारा, सांगली, कोल्हापुरात म्हणूनच वाढला कोरोना; पुणे-मुंबईकरांचा राबता बाधला

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबरदस्त तडाखा पश्चिम महाराष्ट्राला बसला. त्यातही सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वाढता संसर्ग कमी होण्याचे नाव घेत नसल्याने प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आजही हे तीनही जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. या दुरवस्थेच्या अनेक कारणांपैकी निर्बंधांना झुगारून पुण्या-मुंबईहून दाखल झालेली गर्दी हे एक प्रमुख कारण असल्याच्या चर्चेने आता जोर धरला आहे. १४ एप्रिल रोजी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर उन्हाळ्याची सुटी गावीच घालवण्याच्या इराद्याने खासगी ट्रॅव्हल्स, जीप, अगदी रिक्षानेसुद्धा कुटुंबे आली आणि संसर्ग वाढत गेला.सातारा- पाहुण्यांची गर्दीसातारा : कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुरक्षित असलेला ग्रामीण भाग दुसऱ्या लाटेत मात्र अक्षरश: पिळवटून निघाला. मुंबई-पुण्याहून खासगी ट्रॅव्हल्स तुडुंब भरून रातोरात ग्रामीण भागात येत आहेत. यातील एकाही प्रवाशाची प्रशासनाकडे नोंद नाही, ना त्यांची चाचणी केली गेली. निर्बंध झुगारून परजिल्ह्यातून आलेल्यांचा संसर्ग वाढण्याला मोठा हातभार लागत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. परजिल्ह्यातून येणाऱ्यांना कोणीही ई-पास मागत नाही की, तुम्हाला परवानगी आहे का, याची विचारणा करत नाही. याचे आश्चर्य गावकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. दुसऱ्या लाटेत गावपातळीवरील समित्याही कार्यरत नव्हत्या. त्यामुळे अशा लोकांना आणखी मोकळे रान मिळाले. गतवर्षी ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा फैलाव फारसा नव्हता. पुणे- मुंबईहून आलेल्या प्रवाशांमुळे यावेळी संसर्ग वाढला. त्यांना गतवर्षीसारखे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले नव्हते. याचे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत.    -उत्तम वाघ,     रा. तारळे, जि. सातारागतवर्षी गावामध्ये बांबू आडवे लावून वाहतूक अडवण्यात आली होती; पण यंदा असे काहीच केले नाही. त्यामुळे पुणे- मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त होती.    -संदीप साळुंखे, रा. कडवे बुद्रुक, ता. पाटण, जि. साताराकोल्हापूर- गृह विलगीकरण महागातकोल्हापूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी जितके गांभीर्य गावागावात पाळले गेले, तेवढे गांभीर्य दुसऱ्या लाटेवेळी पाळले गेले नाही हे वास्तव आहे. कोरोनाचा संसर्ग वाढण्यासाठी गृह विलगीकरण नसणे हे महत्त्वाचे कारण ठरले आहे. पुणे, मुंबईसह बाहेरच्या शहरांतून आलेले नागरिक थेट घरातच राहिले. त्यांच्या कोणत्याही चाचण्या झाल्या नाहीत. मे महिन्यात जिल्ह्यात ५० हजार नागरिक पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये गृहीत धरलेल्या गावातील संख्या अधिक आहे. कारण पॉझिटिव्ह रुग्ण घरात राहिल्यानंतर शिस्त पाळली गेली नाही. ते घरातीलच इतरांच्या संपर्कामध्ये आले आणि घरचे बाहेर फिरत राहिले. परिणामी संख्या वाढतच राहिली. प्रभाग समित्या, ग्राम समित्यांनीही प्रभावीपणे काम केले नाही. जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीसाठी गृह विलगीकरण हे अनेक कारणांपैकी एक कारण आहे. त्यामुळे जिल्ह्यात शक्यतो संस्थात्मक विलगीकरणाला प्राधान्य द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.    - डॉ. उषादेवी कुंभार, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी, कोल्हापूर जिल्हा परिषदसांगली- तेच सुपर स्प्रेडरसांगली : सांगली जिल्ह्याला कोरोनाची दुसरी लाट तुलनेने फारच महाग ठरली आहे. गृह विलगीकरणाविषयी बेफिकिरी आणि परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांचे बिनधास्त फिरणे नडल्याने पाहता पाहता जिल्हा रेड झोनमध्ये जाऊन बसला.  दुसऱ्या लाटेत संस्थात्मक विलगीकरण गांभीर्याने राबवले गेले नाही. गृह विलगीकरणामध्येच रुग्ण राहिले. त्यांच्यावर कुणाचाच वॉच नसल्याने नियम झुगारून बिनधास्त रस्त्यावर येत राहिले आणि इतरांसाठी ते सुपर स्प्रेडर ठरले. सातारा जिल्ह्यात येणाऱ्या लक्झरी बसवर कारवाई करण्यासाठी रात्री काम करण्यासाठी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाने महिन्यात २४ लक्झरी बसवर कारवाई केली आहे. अद्यापही कारवाईची मोहीम सुरू आहे.    - विनोद चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस