CoronaVirus News : राज्यात मंगळवारी ४ हजार ९०९ रुग्ण; एकूण मृत्युदर २. ६१ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 01:12 AM2020-11-04T01:12:37+5:302020-11-04T06:36:23+5:30

CoronaVirus News: राज्यात सध्या १ लाख १६ हजार ५४३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात ६ हजार ९७३ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत १५ लाख ३१ हजार २७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

CoronaVirus News: 4,909 patients in the last 24 hours in the state; Total mortality rate 2. 61 percent | CoronaVirus News : राज्यात मंगळवारी ४ हजार ९०९ रुग्ण; एकूण मृत्युदर २. ६१ टक्के

CoronaVirus News : राज्यात मंगळवारी ४ हजार ९०९ रुग्ण; एकूण मृत्युदर २. ६१ टक्के

Next

मुंबई :  राज्यात मंगळवारी ४ हजार ९०९ कोरोना रुग्ण आणि १२० मृत्यूंची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांची एकूण संख्या १६ लाख ९२ हजार ६९३ वर पोहोचली असून बळींचा आकडा ४४ हजार २४८ झाला आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.४६ टक्क्यांवर पोहोचले असून मृत्युदर २.६१ टक्के असल्याची नोंद आहे.
राज्यात सध्या १ लाख १६ हजार ५४३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात ६ हजार ९७३ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत १५ लाख ३१ हजार २७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात १७ लाख ९५ हजार ६६६ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ११ हजार ९६९ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. 
राज्यात नोंद झालेल्या १२० बळींमध्ये मुंबई १५, ठाणे ३, नवी मुंबई मनपा ४, कल्याण-डोंबिवली मनपा १, भिवंडी-निजामपूर मनपा १, मीरा-भाईंदर मनपा ३, रायगड १, नाशिक ३, नाशिक मनपा १, अहमदनगर २, पुणे १०, पुणे मनपा ७, पिंपरी-चिंचवड मनपा २, सोलापूर ४, सोलापूर मनपा २, सातारा ६, सांगली १२, सिंधुदुर्ग १, जालना ६, हिंगोली २, परभणी मनपा १, लातूर ६, लातूर मनपा ६, उस्मानाबाद ३, बीड १, नांदेड १, नांदेड मनपा १, बुलडाणा १, वाशिम १, नागपूर १, नागपूर मनपा ३, वर्धा १, भंडारा ६, गोंदिया १, चंद्रपूर मनपा १ या रुग्णांचा समावेश आहे.

४६ दिवसांत १ लाख ८२ हजार सक्रिय रुग्णांत घट 
सप्टेंबरच्या पंधरवड्यानंतर सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसली आहे. १७ सप्टेंबर रोजी ही संख्या ३ लाख १ हजार ७५२ होती, ३० सप्टेंबर रोजी ही संख्या २ लाख ५९ हजार ३३ वर येऊन पोहोचली. तर २ ऑक्टोबर रोजी सोमवारी सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख १८ हजार ७७ वर येऊन ठेपली आहे. परिणामी, मागील ४६ दिवसांत सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली असून हे प्रमाण १ लाख ८२ हजारांनी कमी झाले आहे.

मुंबईत २ लाख ३० हजार रुग्ण कोरोनामुक्त
-  राज्यासह मुंबईत ऑक्टोबरच्या पंधरवड्यानंतर कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला आहे. मुंबईत सोमवारी १ हजार ६४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत २ लाख ३० हजार ६०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा दर ८९ टक्क्यांवर पोहोचला आहे.
-  मुंबईत सध्या १७ हजार ६४५ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत मुंबईतील एकूण कोविडवाढीचा दर ०.३८ टक्क्यांवर पोहोचला आहे. शहर-उपनगरात दिवसभरात सोमवारी ७०६ रुग्ण आणि ३० मृत्यूंची नोंद झाली आहे. 
n परिणामी, मुंबईत एकूण २ लाख ५९ हजार ११४ कोरोनाबाधित असून मृतांचा आकडा १० हजार ३०५ वर पोहोचला आहे. तर रुग्ण दुपटीचा काळ १८२ दिवसांवर गेला आहे. मुंबईत चाळ व झोपडपट्टीच्या परिसरात सक्रिय कंटेनमेंट झोन्सची संख्या ५७६ झाली आहे.

Web Title: CoronaVirus News: 4,909 patients in the last 24 hours in the state; Total mortality rate 2. 61 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.