शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : राज्यात काेराेना रुग्णांच्या मृत्यूंमध्ये ४० टक्क्यांनी घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 06:59 IST

CoronaVirus News in Maharashtra : राज्याच्या आरोग्य विभागाचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, पुढील दोन आठवड्यांत रुग्णसंख्येचे प्रमाण आणखी कमी होईल अशी अपेक्षा आहे. मात्र चाचण्या कमी करण्यात आलेल्या नाहीत.

मुंबई :   राज्याच्या कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून कमी होत असून, दैनंदिन मृत्यूंमध्येही घट झाली आहे. गेल्या पाच महिन्यांत पहिल्यांदा राज्यात दोन अंकी मृत्यूसंख्येची नोंद झाली. हे प्रमाण ४० टक्क्यांनी घटले आहे.राज्यात शनिवारी नोंद झालेले दिवसभरातील काेराेनाचे ७४ मृत्यू हे मागील १५९ दिवसांतील सर्वांत कमी प्रमाण आहे. यापूर्वी, राज्यात २५ मे रोजी दिवसभरात ६० कोरोना रुग्णांचा बळी गेला होता. राज्यात मागील १४ दिवसांत दैनंदिन मृत्यूंची संख्या २०० पेक्षा कमी आहे.दरम्यान, राज्यात दररोज करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांची संख्या जवळपास ७० हजार असूनही पॉझिटिव्हीटी रेटचा आलेख कमी झाला आहे.राज्याच्या आरोग्य विभागाचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, पुढील दोन आठवड्यांत रुग्णसंख्येचे प्रमाण आणखी कमी होईल अशी अपेक्षा आहे. मात्र चाचण्या कमी करण्यात आलेल्या नाहीत. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे मुंबई, ठाणे, सोलापूर आणि कोल्हापूर येथील रुग्णसंख्या कमी झाली आहे. शहरांसह ग्रामीण भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू आहे, त्यामुळे संशयित रुग्णांची तत्काळ तपासणी, निदान आणि उपचार वेळेवर होत असून संसर्गाची साखळी तोडण्यास मदत होत आहे.

मुंबईत काेराेनाचे १८ हजार ५२२ रुग्ण सक्रियमुंबई :  मुंबईत दिवसभरात काेराेनाचे ९०८ रुग्ण आढळले असून २५ मृत्यू झाले. त्यामुळे शहर, उपनगरातील काेराेनाबाधितांची संख्या २  लाख ५८ हजार ४०५ झाली असून आतापर्यंत एकूण १० हजार ३१८ मृत्यू झाले. सध्या १८ हजार ५२२ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.शहर, उपनगरात रविवारी दिवसभरात  १ हजार ७१६ काेराेनाचे रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत २ लाख २९ हजार २५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९ टक्के असून रुग्ण दुपटीचा कालावधी आता तब्बल  १७१ दिवसांवर आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मागील चोवीस तासांत रुग्णांच्या सहवासातील ९ हजार ६६० अतिजोखमीच्या सहवासितांचा शाेध  घेण्यात मुंबई महापालिकेला यश आले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई